मोहोळ तालुका प्रतिनिधी / संभाजी वागज- ट्रक चालकाचे हात पाय बांधून लोखंडाने भरलेला ट्रक पळविला
मोहोळ- सोलापूर जिल्ह्यातील कुर्डुवाडी - पंढरपूर महामार्गावर असणार्या आष्टी ता.मोहोळ शिवारातील माळी वस्ती येथे दि . ४ रोजी पहाटे चारच्या सुमारास चोरट्याने ट्रक पळवला.
मोहोळ पोलिस सुत्रांकडून मिळालेल्या सविस्तर माहितीनुसार ट्रकचालक प्रविण अंबादास सरगर (रा. नाझरा ता . सांगोला ) हे ट्रक क्रमांक एम एच १० झेड १३५२ मध्ये दि . ३ मे रोजी जालना येथील आयकाॅन येथील कंपनीतून १२ टन लोखंडी सळ्या असा एकूण ८ लाख ४० हजार रूपये किंमतीच्या सळ्या भरून सांगली येथे जात होते. दरम्यान मोहोळ तालुक्यातील मौजे आष्टी पाटी शिवारात असणार्या माळी वस्ती येथे ४ मे रोजी पहाटे ४ च्या सुमारास रस्त्याच्या बाजूला ट्रक उभा करून लघुशंकेसाठी थांबले असताना पांढर्या रंगाच्या इंडीका कार मध्ये आलेल्या पाच ते सहा जणांनी त्याला धरून बाजूच्या असणार्या ऊसाच्या शेतात घेऊन गेले आणि डोक्याला बंदुक लावून तलवारीचा धाक दाखवून मारहाण करीत हात पाय बांधून ऊसाच्या फडात टाकून दिले व त्यांच्या ताब्यातील ५ लाख रुपये किंमतीचा ट्रक आणि त्यामध्ये आसणारे ८ लाख ४० हजार रुपये किंमतीचे स्टिल व खिशातील २० हजार रोख रक्कम आणि १५०० रुपये किंमतीचा जिओ कंपनीचा मोबाईल असा एकूण मिळून १३ लाख ६१ हजार ५०० रूपयाचा मुद्देमाल अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याची फिर्याद ट्रक ड्रायव्हर प्रविण सरगर यांनी मोहोळ पोलिस स्टेशन मध्ये फिर्याद दाखल केली असून सदर घटनेची नोंद मोहोळ पोलिस ठाण्यात दाखल झाली आहे . याचा पुढील तपास मोहोळ पोलिस करीत आहेत.
No comments:
Post a Comment