*विठ्ठल रुक्मिणी वज्रलेपाचा मुहूर्त ११ जून २०२२च्या बैठकीत ठरणार, केवळ रुक्मिणीमातेच्या पायावर होणार लेपन*
पंढरपूर : पंढरपूरच्या विठ्ठल आणि रुक्मिणी मातेच्या मूर्तीची धक्कादायक रितीने झालेल्या झीज प्रकरणाचे वास्तव ए.बी.पी. माझाने समोर आणले होते. त्यांनतर आता पंढरपुराच्या मंदिरातील रुक्मिणीमातेच्या पायावर वज्रलेपन करण्याची तारीख ११ जून २०२२ रोजी होणाऱ्या मंदिर समितीच्या बैठकीत ठरणार आहे.
पुरातत्व विभागाने तयारी दाखवल्यास आषाढी पूर्वीच विठ्ठल आणि रुक्मिणी मातेच्या गाभाऱ्यातील ग्रॅनाईट हटविण्याच्या कामाला देखील सुरुवात केली जाणार असल्याचे मंदिर समितीचे सह अध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांनी सांगितले.
रुक्मिणी मातेच्या पायावरील वज्रलेप निघाल्याचे वास्तव ए.बी.पी. माझा ने समोर आणल्यानंतर भारतीय पुरातत्व विभागाच्या पथकाने मंदिराची पाहणी केली होती.
आता त्यांनी आषाढीपूर्वी मूर्तीवर लेपन करण्याची तयारी दाखवली असून नेमके कधी हे लेपन करायचे याचा निर्णय ११ जून २०२२रोजी होणाऱ्या मंदिर समिती बैठकीत होणार आहे .
अगोदर मंदिराच्या हलगर्जीपणामुळे उशीर झाला असताना आणि पुरातत्व विभाग काम करण्याची तयारी दाखवत असताना मंदिर समितीकडून आता ११ जून २०२२च्या बैठकीत निर्णय घेण्याची भूमिका कशासाठी याचे उत्तर मात्र सहअध्यक्षांकडे नाही .
आता आषाढीसाठी काही दिवसांनी देवाचे २४ तास दर्शन सेवा सुरु होणार असताना गाभाऱ्यातील ग्रॅनाईट हटविणे आणि मूर्तीवर वज्रलेप करण्यासाठी अजून वेळ घालवणे अडचणीचे असूनही यावर निर्णय ११ जून २०२२रोजी होणार आहे.
कोरोनाकाळात लॉकडाऊन सुरु असताना २३ आणि २४ जून २०२० रोजी पुरातत्व विभागाकडून विठ्ठल आणि रुक्मिणी मूर्तीला वज्रलेप करण्यात आला होता.
पुरातत्व विभागाने विठ्ठल आणि रुक्मिणी मूर्तीच्या पायावर सिलिकॉनचे लेप दिले होते. हा लेप पुढील ७ ते ८ वर्षे तसा
च राहिल असा दावा करण्यात आला होता.
परंतु दोन वर्षांनंतर विठुराया आणि रुक्मिणी मातेच्या पायावरील दर्शन २ एप्रिलपासून सुरु करण्यात आले.
यावेळी मूर्तीच्या पायाची मोठ्या प्रमाणात झीज होत असल्याच्या तक्रारी भाविकांतून करण्यात आल्या. या प्रकरणाचे वास्तव ए.बी.पी. माझाने समोर आणले होते.
No comments:
Post a Comment