Breaking

Friday, 27 August 2021

सोलापूर जिल्हा प्रतिनिधी /सतिश निंबाळकर - ओबीसी,एसबीसी,व्हिजेएनटी,प्रवर्गातील विद्यार्थ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी अॅड आण्णाराव पाटलांच्या मार्गदर्शनाखाली न्यायालयीन लढाई उभा करून अनोखे आंदोलन साकारण्यात येईल...विजय खुपसे-पाटील.


OBC,SBC व VJNT प्रवर्गातील विद्यार्थ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी ऍड.आण्णाराव पाटील साहेबांच्या मार्गदर्शनाखाली न्यायालयीन लढाई उभा करून अनोखे आंदोलन साकारण्यात येईल..!
-विजय खुपसे-पाटील

कृषी पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रम व्यावसायिक घोषित नसल्याने सदर विद्यार्थ्यांना शिक्षण शुल्क नसल्याने विद्यार्थ्यांना होणारा आर्थिक फटका व विद्यार्थ्यांमधील वाढता रोष लक्षात घेता सदर अभ्यासक्रमांना व्यवसायिक दर्जा मिळावा म्हणून आमच्या सर्व विद्यार्थ्यांनी रस्त्यावर उतरून आंदोलने केली मात्र प्रशासनाने आमच्या विनंतीपूर्वक मागण्यासाठी हिरवा कंदील दाखवत दि.०५ मार्च २०२० रोजी मकूप 019/प्र.क्र.76/7-ओ.पद. 05/03/2020 पा शासन निर्णयानुसार ११ अभ्यासक्रमांना व्यावसायिक घोषित केले.

परिणामी शैक्षणिक वर्ष २०२०-२१ मध्ये सदर अभ्यासक्रमात शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांपैकी
केवळ Open, SC, आणि ST प्रवर्गातील च विद्यार्थ्यांचे अर्ज स्वीकारले आहेत व OBC, VJNT व SBC प्रवर्गातील विद्यार्थ्यांना अर्ज करण्यासाठी परवानगी च दिलेली नाही..

तर हा OBC, VJNT व SBC प्रवर्गातील विद्यार्थ्यांवर जाणूनबुजून अन्याय केल्याची जा परिस्थिती समोर येत आहे तरी तरी विद्यार्थ्यांवर होणारा हा अन्याय दूर करण्यासाठी प्रशासनाने Open, SC,ST प्रवर्गातील विद्यार्थ्यांप्रमाणे २०२०-२१ वर्षासाठी अर्ज करण्यासाठी परवानगी द्यावी अन्यथा अनोखे आंदोलन करण्यात येणार असल्याची माहिती खुपसे-पाटील यांनी दिली.

No comments:

Post a Comment