माढा तालुका प्रतिनिधी /मदन मुंगळे -
पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारला पंतप्रधान पदाची दिमाखदार ८ वर्ष पूर्ण झाल्याबद्ल "आनंदोत्सव " हा कार्यक्रम कुर्डूवाडी येथे भारतीय जनता पार्टी महीला अघाडीच्या वतीने "ऊम्मीद" या HIV ग्रस्त बालकांचे ऊपचार व संगोपन करणार्या संस्थेत लहान मुलांना खाऊ व मिठाई वाटप करून साजरा करण्यात आला.
या वेळी कुर्डुवाडी शहर महिला अध्यक्षा प्रतीक्षाताई गोफणे यांनी मोदी सरकारला ८ वर्ष पुर्ण झाल्याबद्दल सरकारने महीला,वृध्द,बालके,युवक यांच्यासाठी ज्या विविध योजना सरकारने आणल्या त्या आम्ही तळागळापर्यंत पोहचवु,तसेच येणार्या कुर्डुवाडी नगरपरीषदेच्या निवडणुकीमध्ये महीलांचे संघटन ऊभे करुन कुर्डुवाडी शहरात भाजपा चा झेंडा फडकवु असा निर्धार या वेळी केला.
या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणुन महाराष्ट्र प्रदेश महिला आघाडी सचिव मीनाक्षीताई पाटील,सोलापूर जिल्हाध्यक्ष सौ.धनश्री ताई खटके पाटील,भटक्या विमुक्त जमाती च्या जिल्हाअध्यक्ष सौ.मायाताई माने,समाजसेवीका किरण सुराणा,भाजपा युवा मोर्चा माढा तालुका अध्यक्ष उमेश भाऊ पाटील,भाजपा शहरअध्यक्ष शंकर बागल,भाजपा युवा मोर्चा माढा तालुका सरचिटणीस सुधिर भाऊ गाडेकर,स्वाती दास,रोहीणी करंडे,सुहास सरडे,बालाजी गायकवाड,सुरेश खिलारे,अशीष कांबळे,अनंत राऊत यांचे सह भारतीय जनता पार्टी चे कार्यकर्ते ऊपस्थीत होते.
No comments:
Post a Comment