Breaking

Friday, 20 May 2022

विशेष प्रतिनिधी/अजित परबत- डाॅ. बाबासाहेब आंबेडकर नद्या जोड प्रकल्पाचे जनक ठरतात... प्रा.डाॅ. श्रीकांत गायकवाड.


डॉ बाबासाहेब आंबेडकर नद्या जोड प्रकल्पाचे जनक ठरतात......प्रा.डॉ. श्रीकांत गायकवाड सध्या देशात उपलब्ध पाण्यापैकी केवळ 60 टक्के पाण्याचा वापर केला जातो सुयोग्य जलव्यवस्थापन,पाण्याची बचत व साठवणूक करणाऱ्या सेवा सुविधा उपलब्ध झाल्यास समाजाचा सर्वांगीण विकास पर्यायाने कल्याण साधले जाऊ शकते या जाणिवेतून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी पाण्याचा बहुउद्देशीय उपयोग करण्यावर भर दिला. पाणी व्यवस्थापनाचा बृहत आराखडा तयार करून नद्याजोड प्रकल्पाची रचना केली.त्यामुळे ते नद्या जोड प्रकल्पाचे जनक आणि विकास पुरुष ठरतात असे प्रतिपादन महात्मा बसवेश्वर महाविद्यालय लातूर येथील प्रा.डॉ. श्रीकांत गायकवाड यांनी केले.ते येथील मा. ह.महाडिक कला व वाणिज्य महाविद्यालय मोडनिंब च्या वतीने गुरुवार दि 19 मे 2022 रोजी  आयोजित करण्यात आलेल्या एक दिवसीय ऑनलाईन राष्ट्रीय चर्चासत्रात उद्घाटक व प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते.अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.शिवाजी पाटील हे होते.                                   डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची ऊर्जा व जलनीती या विषयावर हे चर्चासत्र मा.ह.महाडिक कला व वाणिज्य महाविद्यालय मोडनिंब, के. एन. भिसे महाविद्यालय कुर्डूवाडी, वसुंधरा कला महाविद्यालय जुळे सोलापुर,कला व वाणिज्य महाविद्यालय माढा यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आले होते.याप्रसंगी प्राचार्य डॉ पी.एस.कांबळे,प्राचार्य डॉ.मिना गायकवाड, प्राचार्य डॉ.एस.आर. ढेरे यांची प्रमुख उपस्थिती होती.कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन संयोजक सचिव प्रा.डॉ. सुभाष गायकवाड यांनी केले. अध्यक्षांची निवड व स्वागत डॉ.पी.बी. भांगे यांनी केले. पाहुण्यांचा परिचय डॉ.विकास नागरे यांनी करून दिला तर आभार एस.पी.काळे यांनी मांडले.

No comments:

Post a Comment