Breaking

Friday, 20 May 2022

सोलापूर जिल्हा प्रतिनिधी/ सतिश निंबाळकर - केतकी चितळेवर कडक कारवाई करा.....मोडनिंब शहर राष्ट्रवादी युवती काँग्रेसची मागणी.


केतकी चितळेवर गुन्हा दाखल करा : मोडनिंब शहर राष्ट्रवादी युवती कॉग्रेसची मागणी ....... राष्ट्रवादी कॉग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर सोशल मिडीयाद्वारे खालच्या पातळीवर केतळी चितळे हिने टिका केलेली होती , सदरची पोष्ट निंदनिय असुन घडलेल्या घटनेचा तिव्र शद्वात निधेष करण्यात आला असुन सदर विकृती मुलीवर गुन्हा दाखल झाला पाहिजे अशी मागणी मोडनिंब शहर राष्ट्रवादी युवती शहर अध्यक्षा कु . ऋतुजा सुर्वे व राष्ट्रवादी विद्यार्थी कॉग्रेसचे जिल्हा अध्यक्ष महेश बोचरे यांनी लेखी निवेदन मोडनिंब पोलिसचे शिवाजी भोसले यांच्याकडे दिले आहे.केतकी चितळे हिने एखादया वरिष्ठ नेत्याची वयाची सुद्धा बरोबर करण्याची लायकी नाही . तरी तीच्यावर ५०५ ( २ ) ' ५०० ., १५३ ( A ) नुसार गुन्हा नोंदवावा व अशा प्रवृतीना आळा बसावा अशी मागणी केली आहे . मोडनिंब पोलीसचे शिवाजी भोसले यांनी निवेदनाचा निश्चित विचार केला जाईल असे अश्वासन दिले यावेळी  रमेश गुटाळ , प्रतिक पाटील , गणेश व्यवहारे आदी उपस्थित होते.

No comments:

Post a Comment