बहुजन सत्यशोधक संघ मोहोळ युवक तालुकाध्यक्षपदी सूर्यजीत लोंढे यांची निवड..... बहुजन सत्यशोधक संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष सुनील ओहोळ यांच्या आदेशानुसार जिल्हा युवक अध्यक्ष महादेव गाडे यांनी ही निवड केली. यावेळी बापूसाहेब शिंदे बहुजन सत्यशोधक संघ कर्मचारी संघ अध्यक्ष म्हणाले की बहुजन युवकांनी मोठ्या प्रमाणामध्ये संघटने मध्ये सामील होऊन समाजावर होणाऱ्या अन्याय अत्याचाराच्या विरोधात संघर्ष करणे गरजेचे आहे बाबासाहेब आंबेडकरांनी या देशाला न्याय समता स्वातंत्र्य बंधुभाव असणार संविधान दिले पण ते संपवण्याचे षड्यंत्र या देशांमध्ये चालू असून याला रोखण्याच काम युवक वर्गच करू शकतो, देशामध्ये महागाई खूप मोठ्या प्रमाणात व वाढत असून देशांमध्ये बेरोजगारी खूप मोठ्या प्रमाणात वाढली आहे याला केंद्र सरकार व राज्य सरकार जबाबदार आहे, शिक्षणाचे खाजगीकरण करून विद्यार्थ्यांना शिक्षणापासून वंचित ठेवला जात आहे , मीडियाच्या माध्यमातून जातीय धार्मिक मुद्दे हायलाईट करून युवकांना भडकावण्याचे काम चालू आहे तरी युवकांनी याकडे लक्ष न देता संघटनेच्या माध्यमातून लोकांना जागृत करून राष्ट्रव्यापी जनआंदोलन करणे गरजेचे आहे, युवकांनी मोठ्या प्रमाणावर रस्त्यावर येणे गरजेचे आहे, बहुजन कर्मचारीवर खूप मोठ्या प्रमाणावर अन्याय आणि अत्याचार होत आहे, कर्मचार्यांच्या पाठीशी आपण ठामपणे उभा रहाव,त्यासाठी कर्मचारी संघ आपल्या पाठीशी आहे असे बापूसाहेब शिंदे म्हणाले,यावेळी जिल्हा युवक अध्यक्ष महादेव गाडे. प्रा.यशवंत बडेकर बेंड शहराध्यक्ष महेंद्र शिंदे. तालुका युवक अध्यक्ष सुरेश वाघमारे. संतोष वाघमारे. आप्पासाहेब ओहोळ. जब्बार बालाजी लोखंडे.दीपक ओहोळ. रवि ओहोळ. वेतला ओहोळ. सिद्धेश्वर वाघमारे.इत्यादी कार्यकर्ते आणि पदाधिकारी या वेळेस उपस्थित होते..
Friday, 20 May 2022
Home
/
मोहोळ
/
सोलापूर
/
मोहोळ तालुका प्रतिनिधी/ संभाजी वागज -बहुजन सत्यशोधक संघाच्या मोहोळ तालुका युवक अध्यक्षपदी सुर्यजीत लोंढे यांची निवड.
मोहोळ तालुका प्रतिनिधी/ संभाजी वागज -बहुजन सत्यशोधक संघाच्या मोहोळ तालुका युवक अध्यक्षपदी सुर्यजीत लोंढे यांची निवड.
About VBP
Chief Editor of VBPNEWS.IN
सोलापूर
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment