मोडनिंब गावातील स्टेशन रोड मुख्य रस्त्याचे डांबरीकरण करण्याची मागणी सोलापूर येथील सार्वजनिक बांधकाम विभाग नं २च्या कार्यकारी अभियंता यांचकडे केली असल्याची माहिती सोलापूर जिल्हा ज्येष्ठ नागरिक समन्वय सनियंत्रण समितीचे सदस्य व फेस्कॉम पुणे प्रादेशिक विभागाचे सचिव हनुमंत कुंभार गुरुजी यांनी सांगितली.
मोडनिंब करकंब हा रस्ता गावातून जातो. उड्डाणपूल ते मारुती मंदिर हा सुमारे दीड किलोमीटर डांबरी रस्ता आहे .या रस्त्यालगत मुख्य बाजारपेठ, विविध बँका, मार्केट यार्ड ,पोस्ट कार्यालय, ग्रामपंचायत कार्यालय, विविध दवाखाने, अंगणवाडी, प्राथमिक, माध्यमिक शाळा, महाविद्यालय, भाजी मंडई, असल्याने याच मुख्य रस्त्यावरून स्थानिक व बाहेरगावाहून आलेले नागरिक, महिला, विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिक, यांना विविध कामासाठी ये - जा करावी लागते .
याच रस्त्यावर अनेक ठिकाणी मोठ- मोठे खड्डे पडलेले आहेत. मध्यंतरी खड्डे बुजविण्याचा प्रयत्न केला परंतु ते खड्डे बुजले गेले नाहीत. त्यामुळे नागरिकांना धूळ आणि वाहतुकीचा खूपच त्रास सहन करावा लागत आहे. म्हणून मोडनिंब मधील स्टेशन रोड मुख्य रस्त्याचे खड्डे बुजविण्याच्या ऐवजी डांबरीकरण करण्यात यावे अशा मागणीचे निवेदन सोलापूर सार्वजनिक बांधकाम विभाग नं. २ चे कार्यकारी अभियंता यांना दिले असल्याची माहिती हनुमंत कुंभार गुरुजी यांनी सांगितली.
No comments:
Post a Comment