Breaking

Saturday, 14 May 2022

मोहोळ तालुका प्रतिनिधी/ संभाजी वागज - मोहोळ येथे उजनी धरण पाणी बचाव संघर्ष समितीची तातडीची बैठक.


मोहोळ येथे आज उजनी धरण पाणी बचाव संघर्ष समितीची तातडीची बैठक
 'मामांनी करून दाखवलं; लाकडी निंबोणी उपसा सिंचन साठी ३४८ कोटी रुपये मंजूर' अशा आशयाच्या बातम्या सोशल मीडियावर फिरल्या आणि सोलापूर जिल्ह्यातील शेतकरी चवताळून उठला. कोणत्याही परिस्थितीत सोलापूर जिल्ह्याची वरदायिनी असलेल्या उजनी धरणाचे पाणी इंदापूर व बारामती कडे जाऊ द्यायचे नाही अशी भीष्मप्रतिज्ञा घेतलेल्या उजनी पाणी धरण बचाव संघर्ष समितीने तातडीची बैठक बोलावली असून मोहोळ येथील शासकीय विश्रामगृहात अध्यक्ष अतुल खूपसे-पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आज शनिवार १३ मे रोजी बैठक होणार असल्याची माहिती सचिव माऊली हळणवर यांनी दिली. 



गतवर्षी उजनी जलाशयातून ५ टीएमसी पाण्याच्या कारणावरून सोलापूर जिल्हा व इंदापूर तालुक्यातील शेतकऱ्यांमध्ये रणकंदन माजले होते. सोलापूर जिल्ह्यातील चळवळीच्या आणि आक्रमक बाण्यापुढे इंदापूरकरांचा निभाव लागला नाही शेवटी बारामतीकरांना हा घेतलेला निर्णय माघारी घ्यावा लागला होता. मात्र उजनीच्या पाण्याने पुन्हा एकदा वातावरण ढवळून निघाले असून कालच लाकडी निंबोणी उपसा सिंचन योजनेसाठी ३४८ कोटी रुपये मंजूर झाल्याचा जीआर निघाला. मात्र यासाठी नेमके किती पाणी लागणार आहे..? याचा आवर्जून उल्लेख सदरच्या पत्रातून टाळल्याचे दिसते. यामुळे जिल्ह्यातील शेतकरी पुन्हा एकदा चवताळून उठला असून मोहोळ येथे होणाऱ्या उजनी धरण पाणी बचाव संघर्ष समिती कडे लक्ष लागले आहे.



No comments:

Post a Comment