Breaking

Sunday, 1 May 2022

पंढरपूर तालुका प्रतिनिधी/ प्रसाद दप्तरदार - पंढरपूर सिंहगड मध्ये थ्रिडी प्रिंटींग अॅन्ड एॅडिटिव मॅन्युफॅक्चरिंग या विषयावर कार्यशाळा संपन्न.


*सिंहगड मध्ये थ्रीडी प्रिंटिंग अँड ऍडीटिव मॅनुफॅक्चरींग या कार्यशाळा संपन्न*
पंढरपूर येथील सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात एक दिवसीय, थ्रीडी प्रिंटिंग अँड ऍडीटिव मॅनुफॅक्चरींग या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. ही कार्यशाळा सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालय व इन्स्टीट्यूशन ऑफ इंजिनीअर्स इंडिया (आय ई आय) सोलापूर सेंटर यांच्या वतीने आयोजित करण्यात आली होती. नावीन्यपूर्ण प्रकल्प तसेच संशोधनात्मक वृत्त्ती विकसित होण्यासाठी ही कार्यशाळा विद्यार्थ्यांना उपयोगी ठरेल. विद्यार्थ्यांना औद्योगिक क्षेत्रातील आधुनिक तंत्रज्ञान अवगत व्हावे व कल्पकता ते वास्तविक उत्पादन यामधील वेळ कमी व्हावा, हे या अनुषंगाने ही कार्यशाळा महत्त्वाची आहे. वैविध्यपूर्ण प्रकल्प आधारित शिक्षण ही काळाची गरज ओळखून सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात नेहमी अशा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येते. याचा फायदा विद्यार्थ्यांची गुणवत्ता विकास व कॅम्पस प्लेसमेंटमध्ये निवड यामध्ये दिसून येतो. कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. बाळासाहेब गंधारे यांनी केले. उद्घाटन प्रसंगी प्राचार्य डॉ. कैलाश करांडे, उपप्राचार्य डॉ. स्वानंद कुलकर्णी, मेकॅनिकल विभागप्रमुख डॉ. शाम कुलकर्णी, डॉ. बाळासाहेब गंधारे, प्रा. शेखर जेऊरकर उपस्थित होते.
या कार्य शाळेत प्रा. शेखर जेऊरकर (आय ई आय, सोलापूर सेंटर) यांनी इंट्रोडक्शन टू ऍडीटिव मॅनुफॅक्चरींग या विषयावर, तर डॉ. आर एस काटीकर (सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालय, वडगांव, पुणे) यांनी रॅपिड  प्रोटोटायपिंग अँड एफ डी एम. या विषयावर मार्गदर्शन केले आणि प्रा. एस एच लामकाने (सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालय सोलापूर)  यांनी थ्रीडी प्रिंटिंगचे प्रात्यक्षिक सादर केले. या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन  प्रा. हृषिकेश कुलकर्णी यांनी केले तर आभार प्रदर्शन डॉ. बाळासाहेब गंधारे प्रा. नंदकिशोर फुले आदींच्या हस्ते करण्यात आले.
कार्यक्रमाचे आयोजन  डॉ. बाळासाहेब गंधारे व प्रा. उमेश घोलप यांनी केले. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी विभागप्रमुख डॉ. शाम कुलकर्णी, प्रा. संतोष बनसोडे, प्रा. अतुल कुलकर्णी, प्रा. अतुल आराध्ये, प्रा. धनंजय गिराम, प्रा. अनिल जाधव आदींनी परिश्रम घेतले.

No comments:

Post a Comment