पूर्वीप्रमाणे प्रवासी रेल्वे गाड्या सुरु करण्याच्या मागणीचे निवेदन विभागीय रेल्वे व्यवस्थापक सोलापूर विभाग यांना फेस्कॉम पुणे प्रादेशिक विभागाचे सचिव तथा सोलापूर जिल्हा ज्येष्ठ नागरिक समन्वय सनियंत्रण समितीचे सदस्य हनुमंत कुंभार गुरुजी यांनी दिनांक २७एप्रिल२०२२रोजी दिले आहे.
मार्च २०२० मध्ये महाराष्ट्र व भारतात कोरोनाच्या झालेल्या प्रादुर्भावामुळे सुरक्षिततेसाठी लॉकडाऊन जाहीर केले होते, त्याप्रमाणे अनेक निर्बंध लादले होते. प्रवासी रेल्वे गाड्यांची वाहतूक पूर्णपणे बंद केली होती. सध्या कोरोनाची सर्व बंधने शिथिल करण्यात आलेले आहेत. त्यामुळे सर्व प्रकारचे व्यवहार, वाहतूक व रेल्वे वाहतूकही पूर्ण क्षमतेने सुरू झाली आहे. परंतु सोलापूर विभागातील काही गाड्या अद्यापही सुरू न झाल्यामुळे मराठवाडा व सोलापूर विभागातील प्रवाशांची खूपच गैरसोय होत आहे म्हणून सोलापूर- मिरज, मिरज- सोलापूर व परळी- मिरज, मिरज- परळी या व सुरून न केलेल्या अन्य प्रवासी रेल्वेगाड्या पूर्वीप्रमाणे सुरू करून महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेल्या पंढरपूरच्या पांडुरंगाच्या दर्शनाला जाणाऱ्या वारकऱ्यांचा व प्रवाशांचा आशीर्वाद घेण्याचे सदर निवेदनात कुंभार गुरुजी यांनी म्हटले आहे. त्याच प्रमाणे कोल्हापूर -नागपूर ,पंढरपूर- मुंबई आणि बिदर या गाड्यांना मोडनिंब येथे थांबा देण्यात यावा अशाप्रकारच्या मागणीचे निवेदन देण्यात आले आहे.
No comments:
Post a Comment