*पंढरपूर सिंहगड मध्ये "साॅफ्टवेअर टेस्टिंग" या विषयावर व्याख्यान*
पंढरपूर: प्रतिनिधी
कोर्टी (ता.पंढरपूर) येथील एस.के.एन सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरींग महाविद्यालयातील इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरींग विभागातील विद्यार्थ्यांसाठी प्रविण कलुबर्मे यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. हे व्याख्यान मोठ्या उत्साहात संपन्न झाले असल्याची माहिती इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरींग विभाग प्रमुख डाॅ. अल्ताफ मुलाणी यांनी दिली.
व्याख्यानाच्या सुरुवातीस डाॅ. कुतुब्बीदीन काझी यांनी प्रास्ताविक केले. इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरींग विभागाच्या वतीने प्रवीण कलुबर्मे यांचे स्वागत करण्यात आले.
या व्याख्यानात प्रविण कलुबर्मे यांनी "मॅन्युअल अँड ॲटोमॅटीक साॅफ्टवेअर टेस्टिंग" याविषयावर महत्त्वपूर्ण मार्गदर्शन केले. यामध्ये साॅफ्टवेअर टेस्टिंग म्हणजे काय? त्यांचे प्रकार आणि या कौशल्याचा करिअरसाठी कसा फायदा होतो हे सांगितले. याशिवाय इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरींग विभागात करिअरच्या अनेक संधी उपलब्ध असल्याचे मत प्रविण कलुबर्मे यांनी या दरम्यान बोलताना व्यक्त केले.
हे व्याख्यान महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. कैलाश करांडे यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आले होते. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरींग विभागातील सर्व शिक्षक व शिक्षेकेत्तर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन प्रा. वैष्णवी उत्पात यांनी केले.
No comments:
Post a Comment