Breaking

Thursday, 7 April 2022

सोलापूर जिल्हा प्रतिनिधी/ सतिश निंबाळकर - सा.बा.चे मुख्य अभियंता पुणे यांच्या कार्यालयासमोर बहुजन ब्रिगेड चा आंदोलनाचा इशारा.


सा.बा.चे मुख्य अभियंता पुणे यांच्या कार्यालयासमोर बहुजन ब्रिगेडचा आंदोलनाचा इशारा

मुख्य अभियंता यांचे कारवाईचे आश्वासन
 बहुजन ब्रिगेड संघटनेचे अध्यक्ष किरण साठे व प्रदेशाध्यक्ष दत्ता कर्चे यांच्या मार्गदर्शनाखाली बहुजन ब्रिगेडचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष राजेश खरे यांनी 
मुख्य अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग पुणे यांना निवेदन देऊन पंढरपूर विभागाचे  कार्यकारी अभियंता पंढरपूर  संबंधित अधिकाऱ्यांवर व ठेकेदार यांच्यावर कारवाई करण्याची मागणी केली आहे.यावेळी बहुजन ब्रिगेडचे सोलापूर जिल्हा अध्यक्ष राहुल शिंदे उपस्थित होते.

सोलापूर जिल्हा पंढरपूर तालुका येथील करकंब ते मोडनिंब रस्त्याचे चालु असलेले काम अतिशय निकृष्ट असुन संबंधित कामामध्ये वापरले जाणारे मटेरियल हे गुणवत्तापुर्वक नसल्याबाबतचे निवेदन देऊन चौकशी करण्याची विनंती केली होती परंतु ठेकेदार व संबंधित अधिकारी यांचे लागेबंदे असल्याचे दिसत आहे,असे निवेदनात म्हटले आहे.  

करकंब ते मोडनिंब रस्ताचे  चालु असलेले काम अतिशय निकृष्ट दर्जाचे असुन संबंधित कामामध्ये वापरले जाणारे मटेरियल ही गुणवत्तापुर्वक  नसुन मागील 1 महिन्यापूर्वी केलेल्या रस्त्याच्या कामाला मोठ्या प्रमाणात खड्डे पडलेले आहेत व सबंधित कामावर जबाबदार अधिकारीही उपस्थित नव्हते कामावर ना ठेकेदार ना जबाबदार असलेले शाखा अभियंता उपस्थित नव्हते कामगारांच्या मनानेच काम चालू आहे,संबंधित ठेकेदाराला फोन लावला असता ठेकेदार यांनी मला जेवढे पैसे मिळतात तेवढेच मी काम करत असतो असे सांगून माझ्याकडे या कामाची निविदा नाही असे सांगून टाळाटाळ केली आणि उडवाउडवीची उत्तरे त्यामुळे या कामामध्ये ठेकेदार व अधिकारी यांच्या संगनमताने भ्रष्टाचार केला जात असल्याची शक्यता नाकारता येत नाही ठेकेदार व जबाबदार अधिकारी यांना कार्यकारी अभियंता पंढरपूर हे पाठीशी घालत असल्याचे दिसून येत आहे तरी कार्यकारी अभियंता व संबंधित अधिकारी यांची चौकशी करून कारवाई करावी अन्यथा पुणे येथील सार्वजनिक बांधकाम विभागाचे मुख्य अभियंता यांच्या  कार्यालयासमोर दिनांक २० एप्रिल रोजी तीव्र स्वरूपात अर्धनग्न आंदोलन करण्यात येईल असा इशारा बहुजन ब्रिगेड संघटनेचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष राजेश खरे यांनी दिला आहे.सदर निवेदनाची तात्काळ दखल घेऊन मुख्य अभियंता यांनी चौकशी करून जबाबदार अधिकारी व ठेकेदार यांच्यावर कारवाई करण्याचे आश्वासन दिले आहे.

No comments:

Post a Comment