सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयातील स्थापत्य अभियांत्रिकी विभाग व सिव्हिल अभियांत्रिकी विद्यार्थी संघटना यांच्या संयुक्त विद्यमानाने विद्याथ्यासाठी भू-सुधारणा तंत्र या विषयावर व्याख्यान आयोजित केले होते. हे व्याख्यान मोठ्या उत्साहात संपन्न झाली असल्याची माहिती महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. कैलाश करांडे यांनी दिली.
महाविद्यालयात इंजि. संदीप शिवाजी भुताले यांचे ऑनलाईन व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. यामध्ये सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयातील स्थापत्य अभियांत्रिकी विभागातिल ५० हुन अधिक विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. विद्यार्थ्यासाठी हा कार्यक्रम स्थापत्य अभियांत्रिकी विभाग व सीईएसए यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आला होता. हा कार्यक्रम सिव्हिल इंजिनिअरींग विभाग प्रमुख डाॅ. श्रीगणेश कदम यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आला होता. कार्यक्रमचे सुञसंचलन व आभार प्रदर्शन प्रा. सुजित राठोड यांनी केले. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी महाविद्यालयातील सर्व शिक्षक व शिक्षेकेत्तर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.


No comments:
Post a Comment