प्रत्येक महिलेने प्रत्येक महिलेचा सन्मान केला पाहिजे आदर राखला पाहिजे तरच कुटुंब व्यवस्था सुदृढ होऊन प्रत्येक कुटुंबात आनंद निर्माण होईल असे विचार जिल्हा परिषद सदस्य एडवोकेट निजामाला नाईक निंबाळकर यांनी महाराष्ट्र प्रदेश भारतीय जनता पार्टी अल्पसंख्यांक मोर्चा व फलटण तालुका महिला भाजप मोर्चा यांच्या वतीने फलटण शहरातील महिलांना भेटवस्तू वाटपाच्या कार्यक्रम प्रसंगी बोलताना व्यक्त केले.
यावेळी बोलताना त्या म्हणाल्या खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर हे सर्वसामान्यांचे खासदार आहेत त्यांच्या माध्यमातून प्रत्येक महिलेच्या हाताला काम कसे उपलब्ध करून देता येईल याबद्दल मी प्रयत्नशील आहे
कार्यक्रमाच्या सुरुवातीला कुमारी सिद्धि शहा हिने स्वागत व प्रास्ताविक केले कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सौ मनीषा नायगावकर सौ संगीता देशमाने सौ अनिता खटावकर सौ पल्लवी भोजने सौ रसिका भोजने सौ स्वाती कदम सौ माधुरी कोरडे सौ लक्ष्मी काळे सौ पुनम मोहिते सौ शितल मोहिते सौ राणी मोहिते सौ हलीमा शेख सौ सिमा मठपती सौ अस्मा शेख सौ रुपाली साळुंके सौ सुनीता कर्वे यांनी परिश्रम घेतले.
कार्यक्रमाचे आभार फलटण तालुका महिला मोर्चाच्या अध्यक्ष उषा राऊत यांनी मानले सूत्रसंचालन सौ मनीषा काळे यांनी केले तर प्रास्ताविक नंदिनी सावंत यांनी केले.


No comments:
Post a Comment