Breaking

Wednesday, 3 February 2021

मुंबई शहर प्रतिनिधी/ विशाल खडके- देशात पहिल्यांदाच होणार डिजिटल जनगणना...बजेट मध्ये 3,768 कोटी रूपयांची तरतूद.


मुंबई शहर प्रतिनिधी/ विशाल खडके-
देशात पहिल्यांदाच होणार डिजिटल जनगणना; 
बजेटमध्ये ३,७६८ कोटी रुपयांची तरतूद.......
 
देशाच्या इतिहासात यंदा पहिल्यांदाच डिजिटल स्वरुपातील जनगणणना होणार आहे. 
यासाठी अर्थसंकल्पामध्ये ३,७६८ कोटींची तरतूद करण्यात आली आहे, अशी घोषणा केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी  केली. 
दरम्यान, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी नुकतंच जाहीर केलं होतं की, २०२१ ची जनगणना ही मोबाईल अॅपच्या माध्यमातून केली जाणार आहे.
 डिजिटल इंडियाला प्रमोट करण्साठी पारंपारिक पेन आणि पेपरची पद्धतीपासून दूर होण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. 
“जनगणनेची माहिती ही मोबाईल अॅपच्या माध्यमातून गोळा केली जाणार आहे. 
अशा प्रकारे पहिल्यांदाच जनगणनेच्या कामामध्ये मोबाईल फोनचा वापर केला जाणार आहे.
भारत आता पेन आणि पेपर पासून डिजिटल डेटाकडे जात आहे. 
ही देशातील जनगणनेच्या कामातील मोठी क्रांती ठरणार आहे,” असं अमित शाह यांनी म्हटलं होतं. 
 नव्या अॅपमध्ये नागरिकांना स्वतःची आणि कुटुंबियांची माहिती अपलोड करता येणार आहे. 
देशभरात १६ भाषांमध्ये हा कार्यक्रम राबवला जाणार असून त्यासाठी १२,००० कोटी रुपयांची गरज पडणार आहे, असंही शाह म्हणाले होते.

No comments:

Post a Comment