पडसाळी येथे डॅा. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३१ व्या जयंती निमित्ताने विविध मान्यवरांच्या हस्ते प्रतिमा पुजन करण्यात आले.
महामानव डॅा. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारावर श्रध्दा ठेऊन त्यांनी सर्व समाज शिक्षणापासून वंचित राहु नये म्हणुन जीवाचा त्याग करून प्रयत्न केले. त्यांच्याच विचारावर प्रेरित होऊन गरीब कुटुंबातील मुलगी शिकली पाहिजे पुढे गेली पाहिजे आपल्या गावाच नाव केलं पाहिजे हा उद्देश डोळ्यासमोर ठेऊन कु. गायत्री जीवन थोरात या मुलीला नोकरी लागेपर्यंत प्रत्येक वर्षी शिक्षणासाठी ५,०००/- रूपये मदत म्हणुन देण्याचा निर्णय युवक नेते, भारतीय जनता पार्टीचे तालुका सरचिटणीस मा.श्री. योगेश पाटील व सहकारी मित्र परिवार यांचे वतीने घेतला व जिथे गरज पडेल तिथे मदत करण्यासाठी बांधील राहील असा शब्द सर्वानुमते दिला. यावेळी तिला रूपये ५,०००/- ची मदत सचिन पाटील यांचे हस्ते दिले. यावेळी ग्रां.पं.सदस्य भिकाजी थोरात, ग्रां.पं.सदस्य भैरू फरड सर, ग्रां.पं.सदस्य आप्पाराव सलगर, माजी ग्रां.पं.सदस्य नारायण थोरात, महेश पाटील, आण्णासाहेब मुटकुळे, प्रकाश पाटील, संजय मुटकुळे, सिध्देश्वर थोरात, अप्पा थोरात, नागेश थोरात, राहुल थोरात, दीपक थोरात यांच्यासह समाजातील वृध्द व्यक्ती, महिला, युवक, युवती तसेच अनेक मान्यवर यावेळी उपस्थित होते.
अत्यंत उत्साही वातावरणात कार्यक्रम पार पडला उत्कृष्ट असं नेटक नियोजन समाजातील बांधवांनी केलं होत.
No comments:
Post a Comment