शिवलाल रामचंद वाचनालय माढा येथे डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी.
माढा :-- येथील शासनमान्य शिवलाल रामचंद वाचनालय माढा येथे डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी करण्यात आली. वाचनालयाचे संचालक व नगरसेवक चंद्रशेखर गोटे यांच्या हस्ते प्रतिमा पूजन करण्यात आले. विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे व्यक्तिमत्त्व म्हणजे अथांग सागर व विस्तीर्ण आकाश आहे.त्यांची ओळख म्हणजे भारतीय घटनेचे शिल्पकार व दलितमुक्ती चे जनक.परंतु या पेक्षा ही आंबेडकर यांचे कार्य महान आहे. १९४८ साली वीज निर्मिती अधिनियम कायदा लागू केला. देशाची जलनीती अंकुश दामोदर धरण.भाक्रा धरण अशी महाकाय धरणे बांधली.१९३५भारतीय रिझर्व्ह बँक स्थापन करण्यात मोलाचा वाटा आहे.मजूर मंत्री म्हणून कामगार यांच्या साठी कामाचे तास ठरवले.विमा.महागाई भत्ता. रजा.यासह अनेक सुधारणा केल्या.मानव जातीच्या सुखासाठी त्यांनी प्रयत्न केले. असे मनोगत संचालक मदन मुंगळे मनोगत व्यक्त केले.
यावेळी चंद्रशेखर गोटे.सुभाष चवरे.जमील मोमीन.जय कांबळे.सुरज फडतरे. छाया आखाडे.ग्रंथपाल कांतीलाल साळुंके आदी मान्यवर उपस्थित होते.
No comments:
Post a Comment