*प्रेरणा मानव विकास प्रतिष्ठान च्या वतीने डाँ . बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी*
प्रेरणा मानव विकास प्रतिष्ठानच्या वतीने रावगाव ता. करमाळा येथे विश्वरत्न महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १३१ वी जयंती साजरी करण्यात आली यावेळी डॉ. राहुल जाधव व बाळासाहेब कानडे यांच्या हस्ते प्रतिमेचे पूजन करण्यात आले यावेळी डाँ. जाधव बोलताना म्हणाले की , बाबासाहेबांनी आपल्याला शिका संघटित व्हा संघर्ष करा हा संदेश दिला त्यांनी गोरगरीब दीनदलित समाजाच्या न्याय व हक्कासाठी अनेक आंदोलने व सत्याग्रह केले असे डॉ. जाधव म्हणाले यावेळी छत्रपती क्रांती सेनेचे तालुकाध्यक्ष बाबुराव पाटील बोलताना म्हणाले की बाबासाहेब आंबेडकर यांनी अठरा- अठरा अभ्यास केला त्यांना खूप भूक लागली तरीही ते दोन पाव एक कप चहा पिऊन त्यांनी आपली भूक भागवली व निरंतर अभ्यास केला व भारतीय संविधानाची त्यांनी निर्मिती केली यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस सामाजिक न्याय विभागाचे जिल्हा उपाध्यक्ष गणेश कांबळे बोलताना म्हणाले की बाबासाहेबांनी चवदार तळ्याचा सत्याग्रह , हिंदू कोड बिल तयार केले व हिंदू कोड बिलाला संसदेमध्ये मान्यता मिळाल्यामुळे बाबासाहेबांनी कायदेमंत्री पदाचा राजीनामा दिला बाबासाहेबांचे अशी विशाल कार्य आहे आहे असे कांबळे म्हणाले कार्यक्रमाचे प्रास्ताविक संस्थेचे अध्यक्ष रामदास कांबळे यांनी केले तर उपस्थितांचे आभार राजू पवार यांनी मानले यावेळी रावसाहेब जाधव बाळासाहेब कानडे सुरेश केकान जालिंदर आलाट हनुमंत बरडे विजय पवार गणेश पवार संदीप पवार सुधाकर पवार आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
No comments:
Post a Comment