*स्पर्धा परीक्षा विद्यार्थ्यांच्या साठी कराडमध्ये लोकसेवा मोफत वाचनालया मार्फत उपयुक्त पुस्तके, तज्ञ अधिकाऱ्यांचे मार्गदर्शन उपलब्ध होणार आहे. हा उपक्रम कौतुकास्पद असल्याचे मत आयेशा मुल्ला यांनी व्यक्त केले. कराड या ठिकाणी लोकसेवा मोफत वाचनालय या प्रकल्पाच्या उद्घाटन समारंभ प्रसंगी नुकतीच पोलीस उपनिरीक्षक म्हणून निवड झालेल्या मुल्ला यांनी आपले मत व्यक्त केले. अलीकडील काळात स्पर्धा परीक्षेच्या पुस्तकांच्या किमती वाढ झाली आहे सर्वसामान्य विद्यार्थ्यांना पुस्तक खरेदी करणं सहज शक्य होत नाही तसेच तज्ञ शिक्षकांचे मार्गदर्शन घेण्यासाठी सर्वच विद्यार्थ्यांना खाजगी क्लासेसची फी परवडत नाही ही गोष्ट लक्षात आल्यामुळे लोकसेवा तर्फे कराड शहरात गरजू विद्यार्थ्यांसाठी मोफत पुस्तके आणि अभ्यास वर्ग सुरू करण्यात आला आहे. दर रविवारी सुमारे दोन तास तज्ञ शिक्षकांचे मार्गदर्शन विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध आहे तरी या वाचनालयाचा फायदा कराड आणि परिसरातील विद्यार्थ्यांनी घ्यावा असे आवाहन लोकसेवा अध्यक्ष पै अक्षय सुर्वे यांनी केले आहे. स्पर्धा परीक्षा याविषयी अनुभव असलेले शिक्षक मा. निलेश जगताप सर मोफत मार्गदर्शन करणार आहेत. या कार्यक्रमासाठी कराड शहरातील स्पर्धा परीक्षा अभ्यास करणारे विद्यार्थी आणि लोकसेवा पदाधिकारी उपस्थित होते.सूत्रसंचलन अमोल जाधव सर यांनी केले तसेच अभिजित बल्लाळ यांनी आभार मानले*
Friday, 1 April 2022
Home
/
सातारा
/
सातारा जिल्हा प्रतिनिधी/ मारूती सोमुत्ते - लोकसेवा मोफत स्पर्धा परिक्षा मार्गदर्शन केंद्र हा उपक्रम कौतुकास्पद...आयेशा मुल्ला.
सातारा जिल्हा प्रतिनिधी/ मारूती सोमुत्ते - लोकसेवा मोफत स्पर्धा परिक्षा मार्गदर्शन केंद्र हा उपक्रम कौतुकास्पद...आयेशा मुल्ला.
Subscribe to:
Post Comments (Atom)


No comments:
Post a Comment