भोसरे प्रतिनिधी /अमोल हावळे - वंचित बहुजन आघाडीच्या वतीने शिवसेना आमदार संतोष बांगर यांच्या वक्तव्याचा निषेध- याबाबत वृत्त असे की
वंचित बहुजन आघाडी माढा तालुका आणी कुर्डूवाडी शहरातील कार्यकर्त्यांनी शिवसेना आमदार संतोष बागर यांच्या वक्तव्याचा निषेध करत पुतळ्याचे दहन करण्यात आले. आणी छत्रपती शिवाजी महाराज महात्मा जोतीबा फुले,भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, लोक शाहीर आण्णा भाऊ साठे, राज माता जिजाऊ, अहिल्यामाता होळकर, माता रमाई, सावित्रीमाई फुले, यांच्या नावाने घोषणा दिल्या. वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष अॅड प्रकाश आंबेडकर यांच्या बद्दल भर सभेत असभ्य वक्तव्य केले होते. याचा निषेध म्हणून सर्व महाराष्ट्रात वंचित बहुजन आघाडीकडून निषेध व्यक्त केला जात आहे. कुर्डूवाडी शहरात ही निषेध व्यक्त केला.या वेळी उपस्थित जिल्हा अध्यक्ष राहुल चव्हाण,तालुका कार्याध्यक्ष समर्थ आखाडे, तालुका अध्यक्ष दयानंद जानराव, कुर्डूवाडी शहर अध्यक्ष प्रदीप सोनटक्के,आशपाक, माढा तालुका अध्यक्ष सुदर्शन बडेकर, वंचित बहुजन आघाडी पदाधिकारी, अध्यक्ष,सचिव आदी उपस्थित होते.


No comments:
Post a Comment