Breaking

Friday, 1 April 2022

संपादक/ विजयकुमार परबत- नागरिकांकडून पैसे घेऊन सुद्धा नागरिक धान्यापासून वंचित.


संपादक/ विजयकुमार परबत-
नागरिकांकडून पैसे घेऊन सुद्धा नागरिक धान्यापासून वंचित- याबाबत वृत्त असे की स्वस्त धान्य दुकान भोसरे आणी धान्य पुरवठा विभाग माढा यांनी पैसे घेऊन सुद्धा नागरिक धान्य पासून वंचित, भोसरे ग्रामपंचायत तालुक माढा मौजे  भोसरे येथील स्वस्त धान्य दुकान बी व्ही बागल यांनी 10 ते  20 नागरिकांना सांगीतले , रेशनकार्ड वर धान्य घ्यायचे असेल तर अन्न धान्य पुरवठा कार्यालय माढा येथील अधिकारी यांना  प्रत्येक नागरिकांकडून 100 रूप द्यावे लागेल. नाहीतर रेशनकार्ड वर धान्य मिळणार नाही. त्याप्रमाणे नागरिकांनी प्रत्येकी 100 रूपये आणी सर्व कागद पत्रे बागल यांच्याकडे जमा केली.    तरी सुद्धा  1वर्षापासून नागरिक धान्य पासून वंचित आहेत.       बागल यांचे( स्वस्त धान्य दुकान फक्त   5 दिवस चालू असते.) बाकीचे  25 दिवस दुकान बंद असल्यामुळे नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. आठवडी बाजारा दिवशी दुकान चालू पाहिजे. तरीसुद्धा दुकान बंद ठेवले जात आहे. अन्न धान्य पुरवठा कार्यालयातील  कुठल्या अधिकार्यांनी  पैसे घेतले त्या अधिकारी आणी स्वस्त धान्य दुकान बागल भोसरे यांची चौकशी झाली पाहिजे.अशी आता नागरिकांमधून मागणी होत आहे.  धान्या पासून वंचित असलेले नागरिकांना धान्य मिळाले पाहीजे. अशी लेखी तक्रार अमोल हावळे यांनी केली आहे.

No comments:

Post a Comment