गटारींची व चेंबरची दुरूस्ती उन्हाळ्यातच करा, हनुमंत कुंभार गुरूजींची मोडनिंब ग्रामपंचायतकडे मागणी...
मोडनिंब प्रतिनिधी/ पावसाळ्यात मोडनिंब मधील गटारी व चेंबर तुंबतात व पाणी रस्त्यावर येते तर काहींच्या घरात पाणी शिरते अशा गटारींची व चेंबरची दुरुस्ती उन्हाळ्यात करण्याच्या मागणीचे लेखी निवेदन ग्रामपंचायत मोडनिंब यांना दिले असल्याचे सोलापूर जिल्हा ज्येष्ठ नागरिक समन्वय सनियंत्रण समितीचे सदस्य हनुमंत कुंभार गुरुजी यांनी सांगितले.
मोडनिंब मध्ये भूमिगत गटारी करण्याचा उद्देश सांडपाणी रस्त्यावर न येता वाहून जाणे. मोडनिंब ग्रामस्थ दुर्गंधी व रोगमुक्त होणे व त्यांना आनंददायी जीवन जगता यावे हा असून पावसाळ्यात काही भागात भूमिगत गटारी व चेंबर तुंबले जातात. त्यामुळे पाणी रस्त्यावरच साचते तर काही भागात पावसाळ्यात गटारीतून पाणी वाहून जाण्यासाठी अपुरी जागा किंवा उतार कमी पडत असल्याने पाणी वाहून जात नाही. अनेकांच्या घरांमध्ये पाणी शिरते. त्यामुळे ग्रामस्थांना नाहक त्रास सहन करावा लागतो. उदाहरणार्थ दत्तनगर मधील भास्कर पाटील यांचे घर ते संजय शेळके या घरांच्या दरम्यान पावसाळ्यात अशी परिस्थिती निर्माण होते.
तेव्हा मोडनिंब गावातील अशा दुरुस्त्या उन्हाळ्यातच करून घेऊन पावसाळ्यात ग्रामस्थांना त्रास होणार नाही याची दक्षता घेण्यात यावी. अशा मागणीचे निवेदन सरपंच व ग्राम विकास अधिकारी ग्रामपंचायत मोडनिंब यांना दिले असल्याचे हनुमंत कुंभार गुरुजी यांनी सांगितले.


No comments:
Post a Comment