मोडनिंबच्या पृथ्वीराज गिड्डेचे घवघवीत यश
जिल्हा सातारा (वाई ) येथे नुकत्याच राज्यस्तरीय युनिफाईट (कराटे ) स्पर्धा संपन्न झाल्या. दिनांक 26 - 27 फेब्रुवारी रोजी स्पर्धा पार पडल्या . या स्पर्धा स्कूल गेम फेडरेशन ऑफ इंडिया, व खेलो इंडिया, इंडियन युनि फाईट असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने सातारा युनि फाईट असोसिएशन यांच्या वतीने घेण्यात आल्या . स्पर्धेत राज्यातील 21 जिल्ह्यानी सहभाग घेतला होता.,21 जिल्ह्यातून 751 खेळाडूंनी सहभाग घेतला होता,या स्पर्धेमध्ये पृथ्वीराज गिड्डे याने 12वर्षे वयोगटात , 36 किलो वजनी गटात सुवर्ण पदक पटकावले. पृथ्वीराजची निवड देश पातळीवर खेण्यासाठी झाली.या स्पर्धेला प्रमुख पाहुणे श्री युवराज नाईक (जिल्हा क्रीडा अधिकारी सातारा) हे उपस्थित होते. त्याच्या या यशाबद्दल त्यांनी त्याला पुढील स्पर्धा साठी शुभेच्छा दिल्या. त्यासाठी श्री श्रीकांत पुजारी , पालक , वर्गशिक्षिका नाळे मॕडम यांचे मार्गदर्शन लाभले.


No comments:
Post a Comment