बीड जिल्हा प्रतिनिधी/ सुदाम शिंगाडे- हिमायतनगर तालुक्यातील पिकांचे पंचनामे करून तात्काळ शेतकर्यांना नुकसान भरपाई द्यावी:- शरद पाटील- याबाबत सविस्तर वृत्त असे की हिमायतनगर तालुक्यात गेले काही दिवसांपासून परतीचा पाऊस दबा धरून बसलेला आहे, वेळी अवेळी पाऊस पडत आहे, यामुळे तालुक्यातील शेतकर्यांचे पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे, मूग, उडीद, या पिकांपासून रूपयाचाही लाभ मिळाला नाही, एवढेच काय पण डाळी देखील झाल्या नाहीत, आणी या परतीच्या पाऊसामुळे सोयाबीन व इतर पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे, शेतकर्यांच्या हाता- तोंडाशी आलेला घास या अनावश्यक पाऊसाने पळवला आहे, शेतकर्यांच्या दसरा, दिवाळी या सणावर हा परतीचा पाऊस ग्रहण घालतो की काय असे वाटते आहे, आधीच कोरोना महामारीमुळे सर्व जनजीवन विस्कळीत झाले आहे व त्यामुळे अनेकांना हाताला काम नाही त्यामुळे शेतकरी वर्ग पुरता बेजार झाला आहे, यामुळे हिमायतनगर परिसरातील परतीच्या पावसाने नुकसान झालेल्या शेतकर्यांच्या शेतातील पिकांची पाहणी करून लवकरात लवकर पंचनामे करावेत व शेतकर्यांना तात्काळ नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी राॅयल साम्राज्य ग्रुपचे हिमायतनगर तालुकाध्यक्ष शरद पाटील यांनी केली आहे.
Thursday, 15 October 2020
Home
/
बीड
/
बीड जिल्हा प्रतिनिधी/ सुदाम शिंगाडे- हिमायतनगर तालुक्यातील पिकांचे पंचनामे करून तात्काळ शेतकर्यांना नुकसान भरपाई द्यावी.
बीड जिल्हा प्रतिनिधी/ सुदाम शिंगाडे- हिमायतनगर तालुक्यातील पिकांचे पंचनामे करून तात्काळ शेतकर्यांना नुकसान भरपाई द्यावी.
Subscribe to:
Post Comments (Atom)


No comments:
Post a Comment