Breaking

Thursday, 17 February 2022

माढा तालुका प्रतिनिधी/ मदन मुंगळे - पंचायत समितीच्या आवारात स्व.विठ्ठलराव शिंदे यांचा पुतळा उभारण्याची लगबग, जनशक्ती संघटनेने दर्शविला विरोध....तालुक्यात संघर्षमय वातावरण पेटण्याची चिन्हे.


पंचायत समितीच्या आवारात स्व. विठ्ठलराव शिंदे यांचा पुतळा उभारण्याची लगबग
जनशक्ती संघटनेने दर्शविला विरोध
 तालुक्यात संघर्षमय राजकारण पेटण्याची चिन्हे 
 एकीकडे माढा तालुका पंचायत समितीच्या कुर्डूवाडी येथील कार्यालयाच्या आवारामध्ये विद्यमान आमदारबंधू बबनराव शिंदे व संजय मामा शिंदे यांचे वडील आमदार कै. विठ्ठलराव शिंदे यांचा पुतळा उभा करण्याची लगबग सुरू आहे. तर दुसरीकडे या पुतळा उभारणीला जनशक्ती संघटनेच्या वतीने विरोध दर्शविला असून माढा व करमाळा तालुक्यातील राजकीय संघर्ष पेटण्याची चिन्हे असल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. 
##  कुर्डूवाडी येथील शासकीय विश्रामगृह येथे या संघटनेच्या वतीने याबाबत पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती . यावेळी अतुल खूपसे पाटील आरोप करताना म्हणाले कि पंचायत समिती कुर्डूवाडी कार्यालयाच्या आवारा मध्ये सध्या पुतळ्याच्या चबुतऱ्याचे चे काम चालू आहे . याबाबत शासकीय अधिकारी यांच्या कडे याबाबतची लेखी परवानगी मागितली असता त्यांच्या कडून समाधान कारक उत्तरे देण्यात येत नाहीत . याच पंचायत समितीच्या आवारा मध्ये स्वातंत्र्य सैनिकांच्या बाबतचा स्तंभालेखाचा चबूतरा आहे . याच स्तंभालेखाचे सुशोभीकरण करून देशासाठी बलिदान दिलेल्या स्वातंत्र्य सैनिकाचा गुणगौरव करावा . 
 
## अन्यथा या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज, डॉ.बाबासाहेब आंबेडकर, स्व.यशवंतराव चव्हाण यांचा पुतळा उभारावा. अन्यथा शासकीय इमारती समोर कोणताच पुतळा उभारण्यात येऊ नये. माढा तालुका पंचायत समिती कार्यालयाचे गेली सात वर्ष झाले उद्घाटन झाले नाही . उद्घाटना विनाच कारभार चालू आहे . शासकीय अध्यादेशा नुसार एखाद्या शासकीय जागेत पुतळा किंवा इमारतीला नाव देता येत नाही . जर असे झाले तर जनशक्ती संघटनेच्या वतीने भविष्यात आंदोलन करन्यात येईल . यावेळी जनशक्ती संघटनेचे
जिल्हाप्रमुख  नितीन जगताप तालुका प्रमुख गणेश गोंडगिरे गट प्रमुख सुरज धोत्रे सामाजिक कार्य करते मोहन गायकवाड बुवासाहेब नरसाळे उपस्थित हाेते .


*पुतळा शासकीय परवानगीनेच गटविकास अधिकारी *
 माढा तालुका पंचायत समितीचे उपअभियंता नायकवडी यांनी या पुतळ्याचे काम शासकीय नियमा नुसार होत असल्या बाबतची माहिती मला दिलेली आहे . यामुळे हा पुतळा नियमा नुसार होत असल्या बाबतचा खुलासा  माढा तालुका पंचायत समितीचे गटविकास अधिकारी डॉक्टर संताजी पाटील यांनी दिला .

No comments:

Post a Comment