Breaking

Thursday, 17 February 2022

सोलापूर जिल्हा प्रतिनिधी /सतिश निंबाळकर - विद्यमान आमदार हे विकासाच्या थापा मारतात....खुपसे-पाटील.


 विद्यमान आमदार विकासाच्या थापा मारतात : खुपसे-पाटील 
 देश स्वतंत्र झाल्यापासून पोंधवडी गावातील अनेक घरामध्ये लाईट नव्हती, रस्त्याचा प्रश्न भेडसावत होता. आजी-माजी आमदारांनी या प्रश्नांकडे सोयीस्करपणे दुर्लक्ष केले. विद्यमान आमदार फक्त विकासाच्या थापा मारतात. मात्र विज व रस्ता ही महत्त्वाची कामे जनशक्ती ने आंदोलनाच्या माध्यमातून केली. गावामध्ये ८५ इलेक्ट्रिक पोल व दोन ट्रांसफार्मर आले, रस्ता झाला. म्हणजे आपण भारताचा नागरिक या नात्याने गावातील कोणतीही समस्या लोकप्रतिनिधींची अथवा प्रशासनाची भांडून पूर्ण करू शकतो असे प्रतिपादन जनशक्ती चे प्रमुख अतुल खूपसे पाटील यांनी केले. 

पोंधवडी (ता. करमाळा) येथे जनशक्ती शेतकरी संघटनेचा शेतकरी मेळावा व शाखा उद्घाटन पार पडले. यावेळी ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर जनशक्ती वारकरी महाराष्ट्र प्रमुख अविनाश कोडलिगे महाराज, जिल्हा प्रमुख नितीन जगताप, युवा जिल्हा प्रमुख बाबासाहेब चव्हाण, माढा तालुका प्रमुख गणेश गोडिगिरे, सुरज धोत्रे, अजय साबळे, नाना क्षिरसागर, शरद राऊत पै.प्रवीण कोडलिंगे, प्रवीण भिसे, सोनू क्षिरसागर  आदी उपस्थित होते.

 यावेळी बोलताना ह.भ.प.कोडगिले महाराज म्हणाले की, आपला महाराष्ट्र आणि देश युवकांच्या हातात आहे. युवकाने अन्यायाच्या अत्याचाराच्या विरोधात बंड केले पाहिजे. जगण्याचं प्रयोजन शोधतो तो खरा युवक असतो. तालुक्यातील युवकांनी लोकशाहीच्या मार्गाने युवा आवाज बुलंद केला पाहिजे. या राज्यात शेतकरी सुखी नाही हे मोठे दुर्भाग्य म्हणावे लागेल. उजनीच्या निर्मितीसाठी तुम्हा शेतकऱ्यांच्या जमिनी केल्या मात्र तुम्हीच पाण्यापासून वंचित आहात यासाठी जनशक्तीचे माध्यमातून आपण लढा उभारला पाहिजे. 

यावेळी अमोल खरात, अप्पा हुलगे, बाप्पू शेंडे, बंडू वाघमारे, सलीम सय्यद, माऊली ननवरे, अभिजीत कोडलिंगे, गणेश काळे, बाळू कोलते, संदीप तळेकर, संतोष ईदवते, गोपाळ ननवरे, आबा नेम्हाणे, राणा महाराज, रामराजे डोलारे, अतुल राऊत, दत्तात्रय कोकणे, हनुमंत कानतोडे, अक्षय तावरे, हरी सराटे, रवी टेलर, रणजीत बिरंगळ, वैभव मस्के, सागर शिंदे, पांडुरंग भोसले, शरद एकाड, बुवासाहेब नरसाळे, अजित सय्यद,  साहेबराव विटकर, दिलीप देशमुख, शकील शेख, किरण थोरात, दिगंबर इनामदार, हमीद इनामदार यांच्यासह शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

No comments:

Post a Comment