मोडनिंब येथील प्रधानमंत्री आवास घरकुल योजनेचा फेर सर्वे करून पात्र लाभार्थ्यांना न्याय देण्यात यावा अशा मागणीचे निवेदन सोलापूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांना ई-मेल द्वारे देण्यात आल्याची माहिती सोलापूर जिल्हा ज्येष्ठ नागरिक सन्मान व सनियंत्रण समितीचे अशासकीय सदस्य हनुमंत कुंभार यांनी सांगितली
मोडनिंब येथील सन २०१८-१९ मध्ये ८७८लाभार्थी यादी प्रपत्र ड मध्ये प्रशासनाकडे मंजुरीसाठी पाठवली होती. त्यापैकी सन २०२१-२२ मध्ये फक्त ७३८ लाभार्थ्यांची यादी मंजूर करण्यात आली आहे. उर्वरित १४० लाभार्थी अपात्र ठरवले आहेत. त्यापैकी अनेक लाभार्थी पात्र असूनही नामंजूर करण्यात आले आहेत. त्यामुळे त्यांच्यावर अन्याय झाला आहे. अपात्र ठरवलेल्या अनेक लाभार्थ्यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद सोलापूर यांच्याकडे लेखी तक्रार केली आहे. संबंधित पात्र लाभार्थ्यांवरील अन्याय दूर करण्यासाठी मोडनिंब येथील प्रधान आवास योजनेचे फेर सर्वेक्षण करण्यात यावे. अशी मागणी केली असल्याचे हनुमंत कुंभार यांनी सांगितले.


No comments:
Post a Comment