Breaking

Sunday, 13 February 2022

मंगळवेढा तालुका प्रतिनिधी/ अमिर आतार - उत्तम स्वास्थ्यासाठी सूर्यनमस्कार जीवनात आवश्यक....डाॅ.स्वानंद कुलकर्णी.


*उत्तम स्वास्थ्यासाठी सूर्यनमस्कार जीवनात आवश्यक*
       - डाॅ. स्वानंद कुलकर्णी

*पंढरपूर सिंहगड महाविद्यालयात "आझादी का अमृतमहोत्सव"  कार्यक्रम संपन्न*
माणसाच्या सर्व इंद्रियांना व्यायाम केल्याने सर्वञ रक्ताचा पुरवठा होतो. सूर्यनमस्कार केल्याने थोड्या वेळात पुरेसा शरीराला व्यायाम मिळतो. दैनंदिन जीवनात आरोग्य चांगले राहण्यासाठी सूर्यनमस्कार करणे आवश्यक आहे. सूर्यनमस्कार मुळे सर्वांगसुंदर व्यायाम होऊन आत्मिक, मानसिक व शारीरिक सामर्थ्य प्राप्त होते. स्वतःच्या उत्तम स्वास्थ्यासाठी सूर्यनमस्कार जीवनात आवश्यक असल्याचे मत पंढरपूर सिंहगड महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. स्वानंद कुलकर्णी यांनी "आझादी का अमृतमहोत्सव" या कार्यक्रमात बोलताना व्यक्त केले.
     एस.के.एन सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरींग महाविद्यालयात बुधवार दिनांक ९ फेब्रुवारी रोजी "आझादी का अमृतमहोत्सव" हा कार्यक्रम महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. कैलाश करांडे यांच्या मार्गदर्शनाखाली सूर्यनमस्कार हा कार्यक्रम घेण्यात आला. 
    या मध्ये महाविद्यालयातील सर्व शिक्षक व शिक्षेकेत्तर कर्मचारीवर्ग सहभागी झाला होता. पंढरपूर सिंहगड महाविद्यालय, "राष्ट्रीय सेवा योजना" वतीने स्वस्थ भारत, आयुषमान भारत, आरोग्य भारत हा कार्यक्रम राबविण्यात आला. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी महाविद्यालयातील उपप्राचार्य डॉ. स्वानंद कुलकर्णी, प्रा. अतुल आराध्ये आदीसह महाविद्यालयातील सर्व शिक्षक व शिक्षेकेत्तर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.

No comments:

Post a Comment