कराड (प्रतिनिधी) गत आठवड्यात कराड तालुक्याचे तहसीलदार विजय पवार व त्यांच्या कार्यालयातील अन्य कर्मचारी कोरोना बाधित आल्याची घटना ताजी असतानाच आज कराड नगरपालिकेचे मुख्याधिकारी रमाकांत डाके यांच्यासह कर विभागातील आणखी चार जणांचा कोरोना अहवाल बाधित आल्याने नगरपालिकेत खळबळ उडाली आहे.
दरम्यान नागरिकांनी आपल्या आरोग्याची काळजी घेणे गरजेचे असून थोडी जरी शंका आल्यास डाॅक्टरांचा सल्ला घ्या, किंवा तात्काळ कोरोना चाचणी करून घ्यावी. सध्या पॉझिटिव्हिटी मोठ्या प्रमाणात वाढत असली तरी त्याची तीव्रता कमी आहे. शासनाने सध्या गृहविलगीकरणाचा कालावधी सात दिवसाचा केला आहे, त्यामुळे नागरिकांनी आरोग्याकडे दुर्लक्ष न करता, न घाबरता कोरोना नियमांचे व निर्बंधांचे पालन करावे असे आवाहन मुख्याधिकारी डाके यांनी कराडच्या नागरिकांना केले आहे.
*सातारा जिल्ह्यात बाधितांचा आकडा हजार पार*...
काल रात्री जाहीर करण्यात आलेल्या रिपोर्टनूसार सातारा जिल्ह्यात 1 हजार 58 बाधितांची (Covid-19 patient) वाढ झाली आहे, तर आज दिवसभरात 705 रूग्ण कोरोनामुक्त (discharged) झाले आहेत.तर आज 5 जणाचा मृत्यू (died of COVID-19) झाला आहे. जिल्ह्यात काल 3 हजार 604 नमूने (swab sample) घेण्यात आले.सध्यस्थितीला जिल्ह्यात 5 हजार 769 अॅक्टीव रूग्ण असून सध्या 6 रूग्ण गंभीर आहेत, तर 230 रूग्ण विविध रूग्णालयात उपचार घेत आहेत.


No comments:
Post a Comment