११व्या हापकिडो बाॕक्सिंग राष्ट्रीय स्पर्धा
अकराव्या हापकिडो बाॕक्सिंग राष्ट्रीय विजेतेपद स्पर्धेचे उद्घाटन पाँडिचेरीचे मुख्यमंत्री थिरू रंगासामी व विधानसभा सभापती एम्बलम सेल्वम यांच्या हस्ते सकाळी ९ वाजता होणार आहे.
२२ व २३ जानेवारी २०२२ रोजी पाँडिचेरी येथील राजीव गांधी क्रीडांगणावर हापकिडो बाॕक्सिंग राष्ट्रीय विजेतेपद स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. उद्घाटन सत्रात पाँडिचेरीचे वन व कृषीमंत्री सी. जयकुमार, क्रीडामंत्री ए. नमोशिवायम, माजी आमदार अशोक आनंद, हापकिडो बाॕक्सिंग आशिया महासंघाचे सरचिटणीस अॕड. राज वागदकर, अखिल भारतीय हापकिडो बाॕक्सिंग फेडरेशनचे अध्यक्ष यु. नटराजन, सरचिटणीस शब्बीर पठाण, उपाध्यक्ष संदोष कुमार हेही उपस्थित असतील. हापकिडो बाॕक्सिंग संघटना पाँडिचेरी हे स्थानिक आयोजक आहेत.
या राष्ट्रीय विजेतेपद स्पर्धेसाठी गोवा, महाराष्ट्र, कर्नाटक, तामिळनाडू, केरळ, पाँडिचेरी, बिहार, दिल्ली, उत्तर प्रदेश, उत्तराखंड या दहा राज्यातील खेळाडू सहभाग घेत आहेत.
देशभरात हापकिडो बाॕक्सिंग खेळ रूजावा आणि त्याची लोकप्रियता वाढावी, यासाठी सर्वच राज्यातील हापकिडो बाॕक्सिंग संघटना जोमाने कार्यरत आहेत, असे यु. नटराजन यांनी सांगितले.
७२ सुवर्ण पदक व ७२ रौप्य पदक असलेल्या या स्पर्धेत एकूण २०० पुरूष व महिला खेळाडू भाग घेतील. ३० ते ६५ किलो वजनी गटात कनिष्ठ व वरिष्ठ असे चार विभागातील संघ सहभागी होतील.
हापकिडो बाॕक्सिंग राष्ट्रीय विजेतेपद स्पर्धांचे हे आयोजन पूर्वनियोजित असून, कोविड काळातील नियमांचे पालन करूनच या स्पर्धा पार पडतील, अशी माहिती अॕड. राज वागदकर यांनी दिली.


No comments:
Post a Comment