Breaking

Wednesday, 19 January 2022

मंगळवेढा तालुका प्रतिनिधी /अमिर आतार - पंढरपूर सिंहगड मध्ये क्रिएटिव्हिटी टू स्टार्टअप बाय इनोवेशन अम्बेसिटर या विषयावर एक दिवसीय कार्यशाळा संपन्न.


*पंढरपूर सिंहगडमध्ये "क्रिएटिव्हिटी टू स्टार्टअप बाय इनोवेशन अम्बेसिटर" या विषयावर एक दिवशीय कार्यशाळा संपन्न*

पंढरपूर : प्रतिनिधी

कोर्टी (ता. पंढरपूर ) येथील एस. के .एन सिंहगड कॉलेज ऑफ इंजीनिअरिंग महाविद्यालयात रविवार दिनांक १६ जानेवारी २०२२ रोजी ऑनलाइन एक दिवशीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात होते. ही कार्यशाळा मोठ्या उत्साहात संपन्न झाली असल्याची माहिती महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. कैलाश करांडे यांनी दिली.
        ही कार्यशाळा इन्स्टिट्यूट इनोव्हेशन कौन्सिल व इंटरप्रिन्युअर डेवलपमेंट सेल यांच्या संयुक्त विद्यमानाने आयोजित करण्यात आला होता. कार्यशाळेच्या सुरवातीस उपप्राचार्य डॉ. स्वानंद कुलकर्णी यांनी केली. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. कैलाश करांडे यांनी कार्यशाळा बद्दलचे आपले विचार व्यक्त करून कार्यशाळेचे महत्व ऑनलाईन सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांना सांगितले.      क्रिएटिव्हिटी अँड डिझाईन थिंककिंग या विषयावर डॉ. स्वानंद कुलकर्णी यांनी मार्गदर्शन केले. यादरम्यान आय. पी. र अवेरनेस या विषयावर प्रा.अतुल आराध्ये यांनी मार्गदर्शन केले. इंक्युबॅशन सपोर्ट फोर इंनोवेशन या विषयावर प्रा. अमोल जगदाळे यांनी मार्गदर्शन केले. डॉ. बाळासाहेब गंधारे यांनी महाविद्यालयातील ई डी सी सेल  बद्दल महत्त्वपूर्ण माहिती दिली त्यानंतर स्टार्ट स्टार्टअप इन सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालय याबद्दल प्रा. धनंजय गिराम यांनी महत्त्वपूर्ण माहिती दिली. 
  या कार्यशाळेमुळे विद्यार्थ्यांना पेटंट फायलिंग प्रोसेस व उद्योजकता विकास याबद्दल महत्त्वपूर्ण माहिती मिळाली असून भविष्यात विद्यार्थ्यांना या ज्ञानाचा खुप मोठा उपयोगी होणार आहे.
   कार्यशाळेचे आभार प्रदर्शन  व कार्यक्रमाचे समन्वयक चे काम प्रा. विक्रम भाकरे यांनी केले. ही कार्यशाळा यशस्वी करण्यासाठी महाविद्यालयातील प्रा. प्रदीप व्यवहारे , प्रा. गणेश बिराजदार, प्रा. विजय चव्हाण, प्रा. विक्रम भाकरे आदीसह महाविद्यालयातील सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.
    सध्या कोरोना संसर्गजन्य रोगाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेऊन पंढरपूर सिंहगड इंजिनिअरिंग महाविद्यालय हे विद्यार्थ्यांच्या सर्वांगिंण प्रगतीसाठी ऑनलाइन पद्धतीने असे कार्यक्रम आयोजित करून विद्यार्थ्यांना प्रेरणा देत आहे. या कार्यशाळेमध्ये १०० हून अधिक  विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला.

No comments:

Post a Comment