माढा तालुक्यातील भारतीय जनता पार्टीचे अनेक पदाधिकारी राजीनाम्याच्या पवित्र्यात.....
गटातटाच्या राजकारणाला कंटाळून व वरिष्ठांच्या हस्तक्षेपामुळे पक्षवाढीसाठी काम करण्यास वाव मिळत नसल्यामुळे निष्क्रिय पदाधिकारी हा ठपका माथी मारुन घेण्यापेक्षा राजीनामा दिलेला चांगला म्हणून तालुकाध्यक्ष्यांसह सर्व पदाधिकारी राजीनामा देण्याच्या मनस्थितीत आहेत. गटातटाच्या राजकारणामुळे देशातील सर्वात मोठा पक्ष माढा तालुक्यात अडचणीत सापडला आहे. याचं ताजं उदाहरण म्हणजे नुकतीच पार पडलेली माढा नगरपंचायत निवडणूक व कुर्डूवाडी शहरात मागील दीड वर्षापासून शहराध्यक्ष निवड झालेली नाही. तालुकाध्यक्ष यांची इच्छा असुनही काम करण्यास गटातटामुळे अडचणी येत आहेत. अशीच परिस्थिती राहिली तर भविष्यातील नगरपालिका व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या सर्व निवडणुका पक्ष्याला आपले अस्तित्व सिद्ध करण्यासाठी कसरत करूनही हाती काही लागणार नाही. माढा नगरपंचायत सारखी परिस्थिती कुर्डूवाडी नगरपालिकेला पण होणार अशी परिस्थिती निर्माण झाली आहे वरिष्ठांनी जर वेळीच लक्ष घातले नाही तर तालुक्यात पक्ष नावापुरता सुध्दा शिल्लक राहणार नाही अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. जिल्हा पातळीवरील नेत्यांमध्ये समन्वय नसल्यामुळे (गटातटामुळे) तालुक्यातील पदाधिकाऱ्यांच्या अडचणी जाणून घेण्यास कोणीही तयार नाहीत, तसेच तालुक्यातील पदाधिकारी व कार्यकर्ते यांची कोणतिही काम मार्गी लागत नाहीत.
कोणताही पदाधिकारी पक्षावर गटातटाच्या राजकारणामुळे खुश नाही यामुळे माढा तालुक्यात प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत दादा पाटील व विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस साहेब यांनी लक्ष घालण्याची गरज आहे असे पदाधिकारी एकमेकांशी चर्चा करताना दिसत आहेत.


No comments:
Post a Comment