Breaking

Monday, 24 January 2022

माढा तालुका प्रतिनिधी/ मदन मुंगळे - कुर्डूवाडी पंचायत समितीतील त्या 29 कर्मचार्यांवर सीईओंचे आदेश असतानाही पंचायत समीतीकडून अद्यापही कारवाई नाहीच...जनशक्तीचे निवेदन व कारवाईची मागणी.


प्रतिनिधी


 गुरुवार दि.२० जानेवारी रोजी कुर्डुवाडी पंचायत समिती मध्ये सकाळी कार्यालयीन वेळेत २९ कर्मचारी गैरहजर होते ही बाब 'जनशक्ती'चे अध्यक्ष अतुल खुपसे पाटील यांनी निदर्शनास आणून दिल्यानंतर सोलापूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांनी त्या 29 कर्मचाऱ्यांवर बिनपगारी कारवाई करण्याचे आदेश संबंधित प्रशासकीय विभाग प्रमुख यांना दिले होते. मात्र त्यांच्यावर अद्याप कसलीच कारवाई झाली नसून मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या आदेशाला पंचायत समितीने केराची टोपली दाखवल्याने याबाबत जनशक्ती ने निवेदन देऊन कारवाई करण्याची मागणी केली आहे.

याबाबत वृत्त असे की, जनशक्तीचे अतुल खूपसे पाटील काही शेतकऱ्यांच्या कामानिमित्त पंचायत समितीमध्ये गेले असता त्या ठिकाणी अनेक कर्मचारी गैरहजर दिसले. ही बाब त्यांनी गटविकास अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून दिली मात्र ते त्यादिवशी रजेवर असल्याने याबाबत कोणतीच भूमिका घेऊ शकता नसल्याने त्यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांच्याशी संपर्क साधून कुर्डुवाडी पंचायत समिती मधील 29 कर्मचारी कामाची वेळ होऊन गेल्यानंतर ही कामावर हजर नसल्याचे निदर्शनास आणून दिले.

 याबाबत मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी संबंधित विभागातील 29 कर्मचाऱ्यांवर बिनपगारी कारवाई करा असे आदेश प्रशासकीय प्रमुखाला दिले. मात्र आज चार दिवसानंतर ही या गैरहजर कर्मचाऱ्यावर कोणतीच कारवाई झाली नाही. त्यामुळे या कामचुकार कर्मचारी व अधिकाऱ्यांवर कारवाई करा अशा आशयाचे निवेदन जनशक्ती चे संस्थापक अतुल खूपसे पाटील यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांना दिले आहे.
- जिल्ह्यातील सर्व पंचायत समित्यांमधील बहुतांश अधिकारी व कर्मचारी मुख्यालयात वास्तव्यास नाहीत. नोकरीच्या ठिकाणी ते गावाकडे राहून अथवा सोलापुरात राहून ये-जा करतात. त्यामुळे सकाळी येण्यासाठी धावपळ आणि सायंकाळी घराकडे जाण्याची ओढ लागलेली असते. सर्व कर्मचाऱ्यांना व अधिकाऱ्यांना मुख्यालयातच राहण्याचा शासकीय अध्यादेश आहे. मात्र याची अंमलबजावणी होताना दिसत नाही. त्यामुळे तालुकास्तरावरील सर्व कर्मचाऱ्यांना आणि अधिकाऱ्यांना मुख्यालयात राहण्याचे आदेशाची अंमलबजावणी करण्याची सूचना देण्यात यावी अशी मागणी अतुल खूपसे पाटील यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांच्याकडे केली आहे.
 याबाबत मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याशी भ्रमणध्वनीद्वारे संपर्क साधून चौकशी केली असता ते म्हणाले की याबाबत बिनपगारी कारवाई करण्याचे आदेश दिले होते मात्र पुढे काय झाले याची कल्पना नाही. कदाचित त्या ठिकाणचे बिडीओ नसल्याने आदेश काढला नसावा. मात्र या बाबत माहिती घेतो. पण कारवाई होणार याबद्दल शंका नसावी असे दिलीप स्वामी यांनी बोलताना सांगितले.

No comments:

Post a Comment