*नाना पटोले यांनी केलेले वक्तव्य नीचपणा चे असून त्याचा निषेध करतो प्रदेश सरचिटणीस अनुप शहा*
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबाबत नाना पटोले यांनी केलेले वक्तव्य नीचपणा चे असून या नीच प्रवृत्तीचा निषेध करतो असे प्रतिपादन महाराष्ट्र प्रदेश भारतीय जनता पार्टी अल्पसंख्याक मोर्चाचे सरचिटणीस अनुप शहा यांनी केले
फलटण येथे फलटण शहर तालुका भारतीय जनता पार्टी च्या वतीने आज नाना पटोले यांच्या निषेधार्थ प्रांताधिकारी यांना निवेदन देण्यात आले. यावेळी शहा बोलत होते यावेळी फलटण तालुका भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष बजरंग नाना गावडे शहराध्यक्ष अमोल सस्ते जिल्हा उपाध्यक्ष जयकुमार शिंदे शहर उपाध्यक्ष निलेश चिंचकर किसान मोर्चाचे अध्यक्ष नितीन वाघ फलटण तालुका महिला मोर्चाच्या अधक्ष्या उषा राऊत भटक्या विमुक्त जाती जमाती जिल्हा प्रतिनिधी नंदाताई पाटोळे फलटण तालुका अल्पसंख्याक मोर्चाचे अध्यक्ष रियाज इनामदार युवा मोर्चाचे उपाध्यक्ष नितीन जगताप सोमनाथ यजगर भाजपचे कार्यकर्ते आनंद वनवे फलटण शहर व्यापारी आघाडीचे अध्यक्ष राहुल शहा भटक्या विमुक्त जाती जमाती तालुकाध्यक्ष सुनील जाधव युवानेते अभिजीत नाईक निंबाळकर श्रीराम बाजार चे संचालक धनंजय पवार नगरसेवक सचिन अहिवळे यांच्यासह भाजपचे कार्यकर्ते उपस्थित होते.


No comments:
Post a Comment