कोरोनाच्या तिसर्या लाटेवर मात करण्यासाठी
सर्वांची एकजूट महत्वाची : राजश्री पाटील
मंगळवेढा : सध्या महाभयानक कोरोनाची तिसरी लाट आली असून यावर मात करण्यासाठी सर्वांनी एकजूट दाखवणे अत्यंत महत्त्वाचे असल्याचे प्रतिपादन मंगळवेढ्याच्या पोलिस उपविभागीय अधिकारी राजश्री पाटील यांनी केले.
मंगळवेढा तालुका पत्रकार संघ व मंगळवेढा नगरपरिषद यांच्या संयुक्त विद्यमाने व ग्रामीण रुग्णालय मंगळवेढा च्या सौजन्याने सोमवारी दामाजी मंदिरात मोफत भव्य लसीकरण शिबिर घेण्यात आले. उद्घाटन प्रसंगी प्रमुख पाहुण्या म्हणून त्या बोलत होत्या. अध्यक्षस्थानी तहसीलदार स्वप्निल रावडे होते.
व्यासपीठावर मंगळवेढा नगरपालिकेचे मुख्याधिकारी निशिकांत प्रचंडराव, मंगळवेढा तालुका पत्रकार संघाचे संस्थापक अध्यक्ष दिगंबर भगरे, अध्यक्ष केशव जाधव, ग्रामिण रूग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ.दीपक धोत्रे, डॉ.सुलोचना जानकर, न.पा.चे कर निरीक्षक विनायक साळुंखे, ग्रामिण रूग्णालयाचे प्रल्हाद नाशिककर, दामाजी संस्थेचे व्यवस्थापक आनंदराव जावळे उपस्थित होते. पुढे बोलताना राजश्री पाटील म्हणाल्या की, मंगळवेढ्यातील जनतेचे ओळखून मंगळवेढा तालुका पत्रकार संघ व नगरपरिषदेने लसीकरणाचा स्तुत्य असा उपक्रम राबवला आहे. केंद्र शासनाने सुरू केलेल्या कोबी लसीकरण आस एक वर्ष नुकतेच पूर्ण झाले आहे लोकांनी लाभ घेण्यासाठी स्वतःहून पुढे आले पाहिजे तरच आपण कोरोनाला हारवु शकतो. पत्रकारांच्या माध्यामातून कोरोना लसीकरणा बाबात जगरुकता लोकांमध्ये निर्माण होईल. त्यामुळे लोकांचा प्रतिसाद मोठ्या प्रमाणावर वाढीस लागेल. येणार्या काळात तिसर्या लाटेचा प्रतिबंधक उपाय म्हणून. लसीकरण करुन घेणे गरजेचे आहे. कोरोना विरुद्धच्या लढ्यात प्रशासन सतर्क आहे या लढ्यात पत्रकारांनी ही जनजागृती करून आपले योगदान दिले आहे जनतेनेही याकरता पुढे येऊन विरोधी चे लढाई जिंकण्यासाठी प्रशासनाला सहकार्य करावे असे त्या म्हणाल्या.
तहसीलदार स्वप्नील रावडे बोलताना म्हणाले की, कोरोना विरुद्धची लढाई लढाई ही सर्वांची आहे. प्रत्येकाने आपले व आपल्या कुटुंबाचे लसीकरण करून घेणे गरजेचे आहे. मंगळवेढा तालुक्यात अद्यापही काही नागरीकांनी अजूनपर्यंत लसीची एकही मात्रा व दुसरी मात्रा न घेतलेल्यांची संख्या अधिक आहे. नागरिकांनी पुढे येऊन लसीकरण करून घ्यावे.मंगळवेढा तालुक्यात सध्या तिसर्या लाटेची संभाव्यता वाढताना दिसत आहे.लसीकरण करुन घेणे गरजेचे आहे . सर्व शासकीय कार्यालयात कोणत्याही कामासाठी लसीकरण केले असेल तरच प्रवेश दिला जात आहे. त्यामुळे लसिकरण सर्वांनी करुन घ्यावे असे आवाहन तहसीलदार स्वप्निल रावडे यांनी व्यक्त केले.
या शिबीरास पोलीस निरीक्षक रणजीत माने यांनी भेट देवून या उपक्रमाचे कौतुक केले.
या शिबीरात 59 जणांना पहिला,204 जणांना दुसरा तर 12 बुस्टर असे एकूण 275 डोस देण्यात आले.
यावेळी नगरपरिषेदेचे राम पवार यांनी उपस्थितांना माझी वसुंधराबाबत हरीत शपथ दिली.त्यामध्ये ओला,सुका कचरा वेगळा करून घंटागाडीत टाकावा,प्लास्टिकचा वापर करू नये,झाले लावावी,ती जोपासावी व मंगळवेढा शहर स्वच्छ व सुंदर ठेवण्यासाठी प्रत्येक नागरिकाने कटिबद्ध रहावे असे आवाहन करण्यात आले.
यावेळी मंगळवेढा तालुका पत्रकार संघाचे अॅड दत्तात्रय तोडकरी,मनोज अवधुत,प्रमोद बिनवडे,समाधान फुगारे, भिमराव मोरे,दावल इनामदार,प्रशांत माळी, अविनाश मेटकरी,रोहिदास भोरकडे, प्रसाद कसबे,म्हाळाप्पा शिंदे,विलास मासाळ,येताळा खरबडे,सचिन हेंबाडे,दिगंबर गरंडे,मंगळवेढा नगरपरिषदेचे बाबासाहेब पवार,हणमंत गडेकर,विठ्ठल कांबळे,दत्तात्रय ढोणे,बसवेश्वर लंगोटे,सोमनाथ ताड,तेजस सुर्यवंशी,नागन्नाथ राजमाने,महादेव कोंडूभैरी,परिचारिका रागीनी कांबळे यांचेसह गणेश यादव,रामचंद्र हेंबाडे,जनार्दन उन्हाळे,निवृत्ती जगदाळे,रघू चव्हाण,बापू मंंडले आदी उपस्थित होते.
प्रास्तविक राम पवार,सूत्रसंचालन राजेंद्रकुमार जाधव तर आभार प्रदर्शन मनोज अवधूत यांनी केले.


No comments:
Post a Comment