Breaking

Monday, 17 January 2022

संपादक/ विजयकुमार परबत- काँग्रेसचे रफीक शेख हे सह कुटूंब बसणार ऊपोषणाला....काय आहे प्रकरण नक्की वाचा....


काँग्रेसचे रफीक शेख हे सह कुटूंब बसणार ऊपोषणाला- याबाबत वृत्त असे माढा तालुक्यातील मौजे अरण येथील राहीवासी असलेले रफिक शेख हे सह कुटूंब उपोषणाला बसणार असल्याचे निवेदन त्यांनी नुकतेच पोलिस अधीक्षक सो सोलापूर ग्रामीण यांना दिले आहे, त्यांनी या निवेदनात असे म्हटले आहे की
मी माझ्या कुटुंबासह आमरण उपोषणाला बसत आहे,                                        मी श्री रफीक रसूल शेख अध्यक्ष माढा तालुका काँग्रेस आय अल्पसंख्यांक विभाग राहणार अरण तालुका माढा जिल्हा सोलापूर येथील कायमचा रहिवासी असून माझ्यावर सीना माढा प्रकल्प उपविभाग क्रमांक  4 मोडनिंब येथील उपविभाग अभियंता श्री गौरव तात्यासाहेब देवकर यांनी दिनांक 17/ 2 /2020 रोजी माझ्यावर खोटा गुन्हा 353 दाखल केल्यानंतर श्री दत्तात्रय हनुमंत आसबे हे टेंभुर्णी पोलीस स्टेशन अंतर्गत मोडनिंब आऊट पोस्ट बक्कल नंबर पी सी एम एच 73 957 यांनी कोणती ही चौकशी न करता अथवा सदर प्रकरणाची  कोणतीही शहानिशा न करता मी सदर प्रकरणात त्याठिकाणी उपस्थित नसताना माझ्यावर 353 खोटा गुन्हा दाखल केला असून सदरचा प्रकार घडते वेळी मी मोहोळ पोलीस स्टेशन येथे होतो तरीसुद्धा माझ्यावर खोटा गुन्हा दाखल केला व पैशांची मागणी केली व मला अटक केली त्यामुळे माझी जनमाणसात प्रतिष्ठा मलीन झाली मला व माझ्या सर्व कुटुंबाला त्यांच्या चुकीमुळे नाहक मानसिक त्रास झाला तसेच माझे आर्थिक नुकसान झाले आहे त्यामुळे मी आपणाकडे व वरिष्ठाकडे वारंवार विनंती अर्ज व सर्व पुरावे देऊन सुद्धा श्री दत्तात्रय हनुमंत आसबे यांची चौकशी करून त्यांना सेवेतून बडतर्फ करावे म्हणून वारंवार अर्ज केले परंतु सदर अर्जाचा गेल्या दोन वर्षापासून टोलवा टोलवी होत आहे महोदय साहेब आपण याबाबत मला वेळीच न्याय द्यावा अन्यथा मला व माझ्या कुटुंबाला न्याय मिळण्याकरिता ना विलाजा स्तव कोरोना च्या सर्व नियम व अटींचे पालन करून मी माझ्या कुटुंबासह टेंभुर्णी पोलीस स्टेशन समोर दिनांक 25 जानेवारी 2022 रोजी उपोषणास बसत आहे माहितीसाठी मा मुख्यमंत्री साहेब महाराष्ट्र राज्य मुंबई मा ग्रह मंत्री साहेब मा अल्पसंख्यांक मंत्री मा गृह राज्यमंत्री साहेब मा प्रदेशाध्यक्ष काँग्रेस कमिटी मा गृहसचिव साहेब मा पोलीस महासंचालक मा पोलीस महानिरीक्षक साहेब मा जिल्हा अधिकारी साहेब मा उपविभागीय अधिकारी साहेब मा पोलीस निरीक्षक साहेब टेंभुर्णी मा जिल्हाध्यक्ष काँग्रेस कमिटी सोलापूर मा अल्पसंख्यांक जिल्हा अध्यक्ष सोलापूर काँग्रेस कमिटी यांना याबाबत लेखी निवेदन देऊन कळविण्यात आले आहे असे त्यांनी या निवेदनात म्हटले आहे.

No comments:

Post a Comment