Breaking

Saturday, 29 January 2022

संपादक/ विजयकुमार परबत- मंत्रीमंडळाने माफी मागावी अन्यथा उद्रेक अटळ...संभाजी भिडे गुरूजी.


मंत्रिमंडळाने माफी मागावी, अन्यथा उद्रेक अटळ; संभाजी भिडे आक्रमक
------
सांगली : राज्य सरकारने किराणा दुकान आणि मॉलमध्ये वाईन विक्री करण्याचा निर्णय घेतला आहे. 
या निर्णयाविरोधात आता शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे संस्थापक आक्रमक झाले आहेत. 
राज्य सरकारचा हा निर्णय अत्यंत दुर्दैवी, समाजघातक आणि राष्ट्रघातक असून तो तातडीने मागे घ्यावा, 
अन्यथा उद्रेक अटळ आहे,
 असा इशारा भिडे यांनी दिला. 
 संपूर्ण मंत्रिमंडळाने संभाजी महाराजांच्या पायाशी नतमस्तक होऊन माफी मागावी,
 अशी मागणीही संभाजी भिडे यांनी केली आहे. 
शिवप्रतिष्ठानचे संस्थापक संभाजी भिडे यांच्या नेतृत्वाखाली धारकऱ्यांनी  सांगलीचे जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांना निवेदन दिलं. 
महाराष्ट्र सरकारने दुकाने आणि मॉलमध्ये वाईन विक्रीचा घेतलेला निर्णय अत्यंत दुर्देवी, समाजघातक, राष्ट्रघातक, नितीमत्तेचा, शीलाचा संहार करणारा आहे,
 असं मत भिडे यांनी निवेदनातून व्यक्त केलं आहे. 

...तर धारकरी रस्त्यावर उतरणार' वाईनविक्रीच्या मुद्द्यावरून संभाजी भिडे यांनी आंदोलनाचाही इशारा दिला आहे.
 'उगवत्या पिढीला नितीमत्ता, शील, संस्कृती यापासून भरकटत विनाशाच्या दिशेकडे नेणारा हा राष्ट्रघातक निर्णय आहे.
 हा निर्णय तात्काळ मागे घेऊन छत्रपती संभाजी महाराजांच्या पायाशी मंत्रिमंडळाने सामूहिक क्षमा मागावी.
 राज्य सरकारने तातडीने हा निर्णय मागे न घेतल्यास समाजात संतापाची लाट उसळेल. 
शासनाने याची गांभीर्याने दखल घ्यावी, 
अन्यथा सरकारच्या निर्णयाविरोधात धारकरी रस्त्यावर उतरतील,' 
असा इशारा भिडे यांनी दिला आहे.

No comments:

Post a Comment