मुंबई पोलीस दलाने निर्भया पथक व उपक्रमांद्वारे महिला सुरक्षिततेसाठी अतिशय महत्त्वाचे पाऊल टाकले - मुख्यमंत्री उद्धवठाकरे
महिला अत्याचाराच्या घटना घडूच नयेत, दुर्देवाने घडल्याच तर तिथल्या तिथे आरोपींचा बंदोबस्त करणारी यंत्रणा उभी राहावी यासाठी मुंबई पोलीस दलाने निर्भया पथक व इतर उपक्रमांद्वारे महिला सुरक्षिततेसाठी अतिशय महत्त्वाचे पाऊल टाकले आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री उद्धवठाकरे यांनी केले.
मुंबईतील महिलांना आता निर्भया पथकाचे सुरक्षा कवच मिळाले आहे. ९१ पोलीस ठाण्यांत अशी पथके स्थापन होत आहेत. १०३ हा हेल्पलाईन क्रमांक डायल केल्यानंतर या पथकाची मदत मिळेल. निर्भया पथकातील नवीन वाहनांचे मुख्यंत्री उद्धवठाकरे यांच्यासह मान्यवरांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले.


No comments:
Post a Comment