हापकिडो बाॕक्सिंग राष्ट्रीय महासंघ
उपाध्यक्षपदी प्रभाकर ढगेंची निवड
पुणेः प्रतिनिधी
गेली तीन वर्षे हापकिडो बाॕक्सिंग खेळाच्या वाढीसाठी प्रयत्नरत असलेले गोवा हापकिडो बाॕक्सिंग संघटनेचे कार्याध्यक्ष प्रभाकर ढगे यांची हापकिडो बाॕक्सिंग राष्ट्रीय महासंघाच्या उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे.
हापकिडो बाॕक्सिंग राष्ट्रीय महासंघाचे अध्यक्ष यू. नटराजन यांनी २०२२ ते २०२४ या दोन वर्षांसाठी ही निवड जाहीर केली. २०१८ आणि २०२० या दोन वर्षी गोव्यात झालेल्या अखिल भारतीय पातळीवरील हापकिडो बाॕक्सिंग विजेतेपद स्पर्धा आयोजनात प्रभाकर ढगे यांनी विशेष योगदान दिले होते. पाँडिचेरी येथे नुकत्याच झालेल्या राष्ट्रीय हापकिडो बाॕक्सिंग विजेतेपद स्पर्धेच्या वेळी माध्यम व प्रसिद्धी समितीचे अध्यक्ष म्हणूनही त्यांनी यशस्वीपणे जबाबदारी पार पाडली. गोव्याबरोबरच गुजरात, हरयाणा, हिमाचल प्रदेश व पंजाब राज्याचे प्रभारी म्हणून हापकिडो बाॕक्सिंगची संघटनात्मक बांधणी करण्याची जबाबदारी त्यांनी स्वीकारली आहे.
प्रभाकर ढगे यांच्या या निवडीबद्दल अध्यक्ष यू. नटराजन, हापकिडो बाॕक्सिंग आशिया संघटनेचे सरचिटणीस राज वागदकर, दक्षिण आशिया अध्यक्ष रवींद्र चोथवे, कार्यकारी अध्यक्ष डाॕ. जगन्नाथ शिंदे, राष्ट्रीय सरचिटणीस शब्बीर पठाण, खजिनदार संतोष बसवंते, महाराष्ट्र हापकिडो बाॕक्सिंग संघटनेचे कार्याध्यक्ष प्रशांत पवार, विभागीय सचिव प्रशांत गायकवाड, सदस्य उषा नार्वेकर आदींनी त्यांचे अभिनंदन केले आहे.


No comments:
Post a Comment