उत्तर सोलापूर : चार दिवसापूर्वी उत्तर सोलापूर तालुक्यातील मार्डी गावात ३ लहान मुलींचा शेततळ्यात बुडून मृत्यू झाला होता, या दुर्दैवी घटनेने संपूर्ण सोलापूर जिल्हा हळहळला, याच पार्श्वभूमीवर जिल्ह्याचे पालकमंत्री दत्तात्रय भरणे हे सोलापूर दौर्यावर आले होते त्याच वेळी पृथ्वीराज युवा मंचच्या वतीने मृत मुलीच्या कुटुंबीयांना शासनाच्या वतीने मदत मिळावी असे निवेदन देण्यात आले तसेच 'सि या विषयावर प्रकाश टाकत पालकमंत्र्यांनी या घटनेची दखल घ्यावी अशी बातमी शुक्रवारी दुपारी प्रसिद्ध केली होती, या सर्वांची दखल घेत पालकमंत्री दत्तात्रय भरणे
यांनी आपल्या दौर्यात रात्री उशिरा का होईना मार्डी या गावात जाऊन मृत पुजा विजय गरड, सानिका विजय गरड या मयत मुलींच्या मार्डी येथील घरी येऊन व मार्डीजवळच असलेल्या सेवालालनगर येथील मरण पावलेल्या आकांक्षा युवराज वडजे या मुलीच्या घरी जाऊन भेट देऊन या तिन्ही मुलींच्या आई-वडिलांचे सांत्वन केले. राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष बळीरामकाका साठे, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष प्रल्हाद काशीद, मार्डी सोसायटीचे चेअरमन बाबासाहेब पाटील, मार्डी तंटामुक्त गाव समितीचे अध्यक्ष मनोहर जगताप, सेवालालनगरचे सरपंच संजय वडजे, भाजपाचे ज्येष्ठ नेते शिवाजी सोनार, विष्णु जगताप, शशिकांत मार्तंडे, जयदत्त मार्तंडे यावेळी उपस्थित होते. तीनही मुलींच्या कुटुंबियांच्या दुःखात पालकमंत्री या नात्याने मी सहभागी असल्याचे सांगून शासनस्तरावरुन मदत मिळवून देण्यासाठी आपण सर्वतोपरी प्रयत्न करु, असा पुनरुच्चार त्यांनी केला.


No comments:
Post a Comment