हेडलाईन
पोंडीचेरी
पोंडीचेरी येथे सुरू असलेल्या राष्ट्रीय हाफकिडो बॉक्सिंग स्पर्धा राजीव गांधी इनडोअर स्टेडियम येथे संपन्न झाल्या या स्पर्धेमध्ये महाराष्ट् संघाने प्रथम क्रमांक तर उपविजेता कर्नाटक स्टेट आणि तृतीय क्रमांकावर तेलंगणा राहिला या स्पर्धेचे आयोजन पांडिचेरी स्टेट बॉक्सिंग असोसिएशन यांनी केले या स्पर्धेत एशिया चे सचिव राजू वागतकर उपस्थित होते तर भारताचे सचिव शब्बीर पठाण यावेळी उपस्थित होते. या स्पर्धेत महाराष्ट्र संघाने 31 सुवर्ण पदक पटकाविले सोलापूरच्या यश शेळके अजित लोंढे कृणाल डोंगरे यांनी सुवर्ण पदक पटकाविले तर स्वप्नील माने याने रोपे पदक पटकावले या स्पर्धेत राष्ट्रीय पंच म्हणून उमेश शिंदे व किरण पालकर यांनी काम पाहिले महाराष्ट्राचे कोच म्हणून विश्वनाथ शिसोदे यांनी काम पाहिले स्पर्धा यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी संतोष बसवंते महाराष्ट्राचे वर्किंग प्रेसिडेंट प्रशांत पवार यांनी काम पाहिले उत्कृष्ट पंच म्हणून उमेश शिंदे यांना गौरवण्यात आले विजय खेळाडू हापकिदो बॉक्सिंग चे अध्यक्ष मा.सभापती शिवाजी नाना कांबळे डॉ संतोष दळवी यांनी शुभेच्छा दिल्या.


No comments:
Post a Comment