Breaking

Thursday, 27 January 2022

संपादक/ विजयकुमार परबत- राज्यातील 139 नगरपंचायतींच्या अध्यक्षपदांचे आरक्षण जाहीर, अनुसूचित जातीसाठी 17, अनुसूचित जमाती साठी 13 तर खुल्या प्रवर्गासाठी 109 पदे राखीव.


राज्यातील 139 नगरपंचायतींच्या अध्यक्षपदांचे आरक्षण जाहीर अनुसूचित जातीसाठी १७ , अनुसूचित जमातीसाठी १३ तर खुल्या प्रवर्गासाठी १०९ पदे राखीव

मुंबई : राज्यातील १३९ नगरपंचायतींच्या नगराध्यक्ष पदांचे आरक्षण निश्चित करण्यासाठी नगरविकास विभागाचे प्रधान सचिव महेश पाठक यांच्या हस्ते मंत्रालयात आज आरक्षण सोडत काढण्यात आली . या सोडतीमध्ये १३९ नगरपंचायतीपैकी अनुसूचित जातीसाठी १७ , अनुसूचित जमातीसाठी १३ तर खुल्या प्रवर्गासाठी १०९ नगराध्यक्ष पदांचे आरक्षण निश्चित करण्यात आले . नगरपंचायतीच्या अध्यक्ष पदाच्या आरक्षण सोडतप्रसंगी उपसचिव श्रीमती प्रियांका कुलकर्णी छापवाले , अवर सचिव सचिन सहस्त्रबुद्धे हे प्रत्यक्ष तर अमरावती , नागपूर , कोकण , औरंगाबाद , पुणे , नाशिक या विभागीय आयुक्त कार्यालयांमधून जिल्हा प्रशासन अधिकारी आणि संबंधित नगरपंचायतींच्या कार्यक्षेत्रातील लोकप्रतिनिधी दूरदृश्यप्रणालीद्वारे उपस्थित होते . ज्या १३९ नगरपंचायतींच्या नगराध्यक्ष पदाचे आरक्षण आज सोडतीद्वारे निश्चित करण्यात आले त्या नगरपंचायतीचे आरक्षण प्रवर्गनिहाय खालीलप्रमाणे अनुसूचित जातीसाठी अध्यक्षपदाच्या १७ जागा असून त्यातील ९ जागा या अनुसूचित जाती ( महिला ) तर ८ जागा या अनुसूचित जाती ( सर्वसाधारण ) साठी आरक्षित करण्यात आल्या आहेत . अनुसूचित जाती ( महिला ) राखीव- लाखणी , कुही , नातेपुते , खंडाळा ( जि . सातारा ) , जळकोट ( लातूर ) , माळेगाव बुद्रुक , पाटण , देहू , वैराग ( सोलापूर ) 

 अनुसूचित जाती ( सर्वसाधारण ) राखीव- म्हाळुग श्रीपूर , भिसी , केज , देवणी , वाशी , औंढा नागनाथ , संग्रामपूर , लोणंद अनुसूचित जमाती प्रवर्गात अध्यक्षपदासाठी एकूण १३ जागा राखीव असून त्यातील ७ अनुसूचित जमाती ( महिला ) प्रवर्गासाठी तर ६ जागा अनुसूचित जमाती ( सर्वसाधारण ) प्रवर्गासाठी सोडतीद्वारे आरक्षित करण्यात आल्या आहेत . 

अनुसूचित जमाती ( महिला ) राखीव - धानोरा , अहेरी , मोहाडी , बाभुळगाव , साक्री , सोयगाव , शहापूर 

अनुसूचित जमाती ( सर्वसाधारण ) - दिंडोरी , देवरी , गोंडपिंपरी , राळेगाव , भिवापूर , सडक अर्जुनी खुल्या प्रवर्गासाठी एकूण १०९ अध्यक्ष पदे असून त्यातील ५५ अध्यक्षपदे हे महिलांसाठी राखीव निश्चित करण्यात आले आहेत . 

 खुला प्रवर्ग ( महिला ) राखीव- कळंब , समुद्रपूर , अर्जुनी मोरगाव , अनगर , पारशिवनी , मंठा , शेंदुर्णी , हिंगणा , वाभवे वैभववाडी , खालापूर , बदनापूर , चामोर्शी , भातकुली , महादुला , वाडा , वडूज , रेणापूर , दापोली , शिंदखेडा , एटापल्ली , देवगड - जामसंडे , जामणी , कारंजा , महागाव , नायगाव , शिरुर अनंतपाळ , पालम , सिरोंचा , पोलादपूर , कोरपना , देवरुख , देवळा , सेनगाव , लांजा , सावली . फुलंब्री , कोरची , तिर्थपुरी , तळा , पोंभुर्णा , जाफ्राबाद , पाटोदा , जिवती , शिर्डी , कुडाळ , निफाड , धारणी , कर्जत , कुरखेडा , वडगाव मावळ , कोरेगाव , सेलू , आष्टी , सालेकसा , शिरुर - कासार , ■ खुला प्रवर्ग ( सर्वसाधारण ) - गुहागर , अकोले , मुक्ताईनगर , घनसावंगी , मानोरा , मंडणगड , माहूर , आष्टी ( वर्धा ) , कवठे महांकाळ , लोहारा ( बु ) , खानापूर , बार्शी - टाकळी , नांदगाव खंडेश्वर , मुरबाड , ढाणकी , कळवण , हातकणंगले , मुलचेरा , आजरा , दहिवडी , कणकवली , पेठ , पाली , बोदवड , तिवसा , मोताळा , मारेगाव , गोरेगाव , मंचर , मेढा , हिमायतनगर , मौदा , लाखांदूर , भामरागड , सिंदेवाही , मालेगाव - जहांगीर , वडवणी , सुरगाणा , अर्धापूर , चाकूर , धडगाव- वडफळ्या , पारनेर , नेवासा , तलासरी , मोखाडा , विक्रमगड , माणगाव , म्हसळा , कसई - दोडामार्ग , कडेगाव , शिराळा , माळशिरस , माढा , चंदगड , सन २०२० च्या महाराष्ट्र अधिनियम क्र . १२ नुसार महाराष्ट्र नगरपरिषदा , नगरपंचायती आणि औद्योगिक नगरी अधिनियम १९६५ मध्ये सुधारणा करण्यात आली आहे . त्यानुसार नगरपंचायतींचे नगराध्यक्ष हे प्रचलित पद्धतीने  नगरसेवकांमधूनच निवडले जात असून त्यांचा पदावधी अडीच वर्षे इतका करण्यात आला आहे . नगराध्यक्षपदाचे आरक्षण निश्चित करताना राज्यातील नगरपंचायतींमध्ये अनुसूचित जाती किंवा अनुसूचित जमातीच्या लोकसंख्येचे राज्यातील नगरपंचायतींमधील एकूण लोकसंख्येशी जे प्रमाण असेल त्या प्रमाणानुसार अध्यक्षांची पदे राखीव ठेवण्यात आली आहेत . प्रत्येक प्रवर्गात निम्म्यापेक्षा कमी नाहीत इतकी पदे महिलांसाठी आरक्षित ठेवण्यात आली आहेत . एखादी नगरपंचायत अनुसूचित जाती किंवा अनुसूचित जमाती प्रवर्गासाठी येत असल्यास तेथे ज्या प्रवर्गाच्या लोकसंख्येची टक्केवारी अधिक आहे , अशा प्रवर्गासाठी ती राखीव ठेवण्यात आली आहे .

No comments:

Post a Comment