Breaking

Thursday, 9 December 2021

मंगळवेढा तालुका प्रतिनिधी /अमिर आतार - सिंहगड चा गीट हब कंपनीबरोबर सामंजस्य करार.


*पंढरपूर सिंहगडचा "गीट हब" कंपनीबरोबर सामंजस्य करार

 अमेरीका येथील "गीट हब" बहुराष्ट्रीय नामांकित तसेच कोडींगच्या  क्षेत्रात अग्रगण्य असलेली कंपनी असुन या कंपनीत सोबत कोर्टी (ता.पंढरपूर) येथील एस. के. एन. सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरींग महाविद्यालयासोबत नुकताच सामंजस्य करार झाला असल्याची माहिती काॅम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरींग विभाग प्रा. नामदेव सावंत यांनी दिली.
       या सामंजस्य करारामुळे पंढरपूर सिंहगड इंजिनिअरींग काॅलेज मध्ये द्वितीय, तृतीय व चतुर्थ वर्षांत शिक्षण घेत असलेल्या सर्व शाखेतील विद्यार्थ्यांना आय.टी कंपन्यामध्ये नोकरी लागण्यासाठी कोडींग बद्दलचे  मोफत मार्गदर्शन करण्यात येणार असुन यासाठी आवश्यक असलेले अभ्यासाचे साहित्य "गीट हब" या कंपनीकडून महाविद्यालयात प्राप्त झाले आहे. सदर साहित्य संबंधित विद्यार्थ्यांनी महाविद्यालयांतून घेऊन जाण्याचे आवाहन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. कैलाश करांडे यांनी केले आहे.
     अलीकडच्या कालावधीत आयटी क्षेत्रात नोकरीच्या अनेक संधी उपलब्ध झाल्या आहेत. पंढरपूर सिंहगड व "गीट हब" यामध्ये झालेला सामंजस्य करार हा विद्यार्थ्यांना नोकरीसाठी महत्त्वपूर्ण असल्याने पालकांतून यांचे अभिनंदन व कौतुक होत आहे
   हा करार यशस्वी करण्यासाठी महाविद्यालयातील उपप्राचार्य डॉ.स्वानंद कुलकर्णी, डॉ. बाळासाहेब गंधारे, डॉ.अल्ताफ मुलाणी, डाॅ. श्याम कुलकर्णी, डॉ. संपत देशमुख, डॉ. श्रीगणेश कदम, प्रा. श्रीनिवास गंजेवार, प्रा. नामदेव सावंत, प्रा. अनिल निकम, ट्रेनिंग अँड प्लेसमेंट ऑफिसर प्रा. समीर कटेकर आदीसह महाविद्यालयातील सर्व शिक्षक व शिक्षेकेत्तर कर्मचारी परिश्रम घेत आहेत.

No comments:

Post a Comment