धक्कादायक :पत्रकार खलील शहानूरकर यांचे निधन ; युवा पत्रकार गेला
सोलापूर : सोलापूर माध्यम क्षेत्रातील नावाजलेला चेहरा पत्रकार खलील शहानुरकर यांचे गुरुवारी निधन झाले. मृत्यू समयी त्यांचे वय 39 होते, त्यांच्या पश्चात मोठा भाऊ, पत्नी व एक मुलगा व एक मुलगी असा परिवार आहे. दमाणी नगर भागात ते रहात होते. दुपारी अचानक त्रास होऊ लागल्याने दमानी नगर भागातील एका खाजगी रुग्णालयात त्यांना उपचारासाठी नेण्यात आले मात्र डॉक्टरांनी मोठ्या हॉस्पिटलकडे हलविण्याचा सूचना केल्या दरम्यान मार्कंडेय हॉस्पिटलमध्ये आणले असता उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर येत आहे. या दुःखद घटनेने माध्यम क्षेत्रावर शोककळा पसरली आहे.
खलील हे उत्कृष्ट कॅमेरामन म्हणून त्यांची सोलापुरात एक वेगळी ओळख होती. त्यांच्या पत्रकारितेची सुरुवात ‘दिनमान’ या चैनल मधून झाली त्यानंतर ‘मी मराठी’ या प्रादेशिक वाहिनी साठी त्यांनी कॅमेरामन म्हणून काम केले. पुढे सोलापूर शहरातील इतर स्थानिक वृत्तवाहिन्यांमध्ये काम केल्यानंतर सध्या ते बी आर न्यूज चॅनल मध्ये मागील अनेक वर्षापासून कार्यरत होते. अतिशय मनमिळावू असं व्यक्तिमत्त्व होतं क्राईम रिपोर्टर म्हणून त्यांचा माध्यमात मोठा दबदबा होता. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे यांच्या अतिशय जवळचा त्यांचा संबंध होता अशा या दिलदार पत्रकार मित्रास VBP न्यूज चॅनल च्या वतीने भावपूर्ण श्रद्धांजली.


No comments:
Post a Comment