Breaking

Saturday, 25 December 2021

मोडनिंब प्रतिनिधी/ बाळासाहेब ओहोळ - विश्वास ताकतोडे सर यांचा सत्कार संपन्न.


टेंभुर्णी बौद्ध विहारात विश्वास ताकतोडे सर यांचा सत्कार.
भारतीय बौद्ध महासभा माढा तालुका सचिव पदी आयुष्यमान विश्वास ताकतोडे सर व महिला विभागाच्या अध्यक्षपदी आयु. अरुणाताई ताकतोडे यांची पुन्हा निवड झाल्याबद्दल टेंभुर्णी येथील बौद्ध विहारात सत्कार करण्यात आला.
यावेळी उपासक आयुष्यमान दत्ता जगताप यांनी कार्यक्रमाचे आयोजन केले व सूत्रसंचालन केले यावेळी सर्व ग्रामस्थ उपासक-उपासिका लहान मुले तसेच प्रतिष्ठित मंडळी माननीय सरपंच प्रमिला ताई खरात आशाताई खरात जयश्री खरात साधनाताई बनसोडे हिराबाई खरात कॉन्ट्रॅक्टर आयुष्यमान सचिन खरात भीमराव खरात दत्तात्रय जगताप दौलत खरात आप्पासाहेब खरात सुभाष नाना खरात इत्यादी उपस्थित होते यावेळी आपल्या भाषणात ताकतोडे सर म्हणाले की देश धम्माच्या मार्गाने गेल्यास देशात सुख-शांती नांदेल देशाला युद्धाची नव्हे तर बुद्धाची गरज आहे धम्माचा मार्ग हा ज्ञानाचा मार्ग आहे याच मार्गाने आपण सुखी होऊ शकतो लहान मुलावर धम्माचे संस्कार करा असेही ते म्हणाले कार्यक्रमाच्या शेवटी आयुष्यमान सचिन खरात यांनी उपस्थितांचे आभार मानले तर कार्यक्रमाचे अध्यक्ष दत्ता जगताप होते.

No comments:

Post a Comment