Breaking

Saturday, 25 December 2021

टेंभूर्णी शहर प्रतिनिधी /अक्षय खंदारे - सावकाराच्या त्रासाला कंटाळून टेंभूर्णी येथे सलून व्यावसायिकाची आत्महत्या.


सावकाराच्या त्रासाला कंटाळून टेंभूर्णी येथे सलून व्यावसायिकाची आत्महत्या-  याबाबत वृत्त असे की माढा तालुक्यातील मौजे टेंभूर्णी येथे सावकाराच्या त्रासाला कंटाळून सलून व्यावसायिकाने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे, 

याबाबत टेंभूर्णी पोलिस ठाण्याकडून मिळालेली अधिक माहिती अशी, फिर्यादी वर्षा कासवेद हिने दिलेल्या फिर्यादीनुसार पती खंडू महादेव कासवेद याने सौदागर वसंत साळुंखे ( रा.बायपास रोड टेंभूर्णी ) व दिलिप कृष्णा गोरे ( रा.पंढरपूर) यांच्या कडून व्याजाने पैसे घेतले होते. मयत इसम खंडू कासवेद याने सौदागर वसंत साळुंखे याचे 7 लाख रुपये व दिलीप गोरे याचे 5 लाख रुपये व्याजासह परत करून देखील राहिलेल्या 50 हजार रूपयांसाठी हे सावकार वारंवार  घरी येऊन धमकी देत होते, त्यामुळे या सर्व त्रासाला कंटाळून फिर्यादीच्या पतीस आत्महत्येस प्रवृत्त केल्याचे नमूद केले आहे, त्यामुळे सौदागर वसंत साळुंखे व दिलीप गोरे या दोन सावकारांविरोधात टेंभूर्णी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक मोनाली पवार या करीत आहेत.

No comments:

Post a Comment