Breaking

Saturday, 4 December 2021

मंगळवेढा तालुका प्रतिनिधी /अमिर आतार - आयटी कंपनीत नोकरी पंढरपूर सिंहगडचा सामंजस्य करार.


*आयटी कंपनीत नोकरी देण्यासाठी पंढरपूर सिंहगडचा सामंजस्य करार*

*महाविद्यालयातील ३१ विद्यार्थ्यांची प्रशिक्षणासाठी निवड*

पंढरपूर: प्रतिनिधी 

कोर्टी (ता.पंढरपूर) येथील एस. के. एन. सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरींग महाविद्यालयाचा पुणे येथील सीटी बँक सोबत नुकताच सामंजस्य करार झाला असून या कंपनी मार्फत विद्यार्थ्यांना उच्च दर्जाच्या प्रशिक्षण देण्यात येणार आहेत या प्रशिक्षणासाठी महाविद्यालयातील विविध विभागातील ३१ विद्यार्थ्यांची निवड झाली असल्याची माहिती महाविद्यालयाचे प्राचार्य  डॉ. कैलाश करांडे यांनी दिली.
   अभियांत्रिकीच्या शिक्षण क्षेत्रात सिंहगड संस्थेचा विस्तार खुप मोठ्यात आहे. या संस्थेत शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना नामंकित कंपन्यांमध्ये नोकरीच्या खुप मोठ्या संधी उपलब्ध आहेत. पंढरपूर सिंहगड महाविद्यालयातील अभियांत्रिकीचे शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांना सीटी बँकेकडून नोकरीसाठी आवश्यक असलेले उच्च दर्जाचे प्रशिक्षण देणार येणार आहे. या प्रशिक्षणासाठी महाविद्यालयात अंतिम वर्षात शिक्षण घेत असलेल्या मेघा कंटुटे, प्रज्ञा गुंजाळ, माधुरी दस, पुजा दाभोळकर, सोनाली जाधव, रामेश्वर चवरे, आरती येमूल, शुभम बाबर, आकाश पिसे, कोमल वागधरे, राकेश देशमुख, माधुरी फराडे, आरती शेळके, प्रियंका माने, रोहित मुंगसे, उमा गायकवाड, शुभांगी कोळी, विद्याराणी क्षीरसागर, तेजश्री बोडके, शुभम मोटे, रुक्मिणी खिलारे, प्राजक्ता उंबरकर, रोहन कसबे, पुजा कापसे, मधुकर बिडवे, माधुरी गायकवाड, रणजित नलवडे, किस्तीजा पुर्वत, शुभम लहांडे, रेश्मा खपाले आणि आसावरी कांबळे आदी विद्यार्थ्यांची "सीटी बँक" कंपनीत प्रशिक्षणासाठी निवड झाली आहे.
   या कंपनी मार्फत विद्यार्थ्यांना मोफत राहण्याची सोय, नाश्ता, जेवण उपलब्ध होणार आहे. तसेच आर्टिफिशियल इंटेलिजन्स, जावा, अँडव्हान्स जावा इत्यादी आयटी कंपन्यात आवश्यक असलेले आधुनिक तंत्रज्ञानाचे प्रशिक्षण देण्यात येणार आहे. याशिवाय विद्यार्थ्यांना साॅफ्टस्कील, अँप्टीट्युड स्कील, एमकॅट, टेस्ट सिरीज, लिंकडिन, प्रोफाईल बिल्डिंग इत्यादी गोष्टीचा फायदा एक महिना निवासी प्रशिक्षणातून मिळणार आहे. याचा फायदा विद्यार्थ्यांना नामंकित कंपनीत नोकरी मिळविण्यासाठी खुप मोठ्या प्रमाणात उपलब्ध होणार आहे. या निवडीबद्दल पालक व विद्यार्थी वर्गातुन आनंद व्यक्त होत आहे.
    प्रशिक्षणासाठी निवड झालेल्या विद्यार्थ्यांचे महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. कैलाश करांडे, उप-प्राचार्य डॉ. स्वानंद कुलकर्णी, ट्रेनिंग अँड प्लेसमेंट ऑफिसर प्रा. समीर कटेकर, प्रा. अभिजित सवासे, प्रा. योगिनाथ कलशेट्टी, प्रा. मेघा गोरे, प्रा.अतुल कुलकर्णी, प्रा. अमोल कांबळे, प्रा. बाळकृष्ण जगदाळे, प्रा. दत्तात्रय कोरके आदीसह महाविद्यालयातील सर्व शिक्षक व शिक्षेकेत्तर कर्मचाऱ्यांनी अभिनंदन केले.

No comments:

Post a Comment