*प्रथम वर्ष अभियांत्रिकी प्रवेशात सिंहगड इन्स्टिट्युट राज्यात अव्वल*
*अंतिम वर्षांत शिक्षण घेत असलेल्या १९६७ विद्यार्थ्यांना सिंहगड इन्स्टिट्युट मधुन नोकरी*
पंढरपूर: प्रतिनिधी
प्रथम वर्ष अभियांत्रिकी प्रवेश प्रक्रिया सुरू असून चालू शैक्षणिक वर्ष २०२१-२२ या वर्षातील प्रथम वर्ष अभियांत्रिकीच्या प्रवेश प्रक्रियेतील प्रथम फेरीत सिंहगड इन्स्टिट्युटला सर्वाधिक म्हणजे ४००७ विद्यार्थ्यांनी पसंती दर्शविली असल्याची माहिती प्राचार्य डॉ. कैलाश करांडे यांनी दिली.
सिंहगड इन्स्टिट्युटने सातत्यपूर्ण निकाल व नामांकित कंपनीत प्लेसमेंट याचबरोबर विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी सामंजस्य करार, आंतरराष्ट्रीय शोधनिंबध परिषद असे अनेक उपक्रम राबवून विद्यार्थ्यांना सर्वगुण संपन्न घडविण्याचे काम सिंहगड संस्था मोठ्या जोरात करत आहे. अगदी कोरोना कालावधीत विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये म्हणून सोशल मीडियाच्या माध्यमातून ऑनलाईन लेक्चर च्या माध्यमातून विद्यार्थ्यांना ज्ञानार्जन सिंहगड इन्स्टिट्युटने केले आहे.
प्रत्येक वर्षी दर्जेदार व बहुराष्ट्रीय कंपनीत होणारे प्लेसमेंट तसेच शासकीय व निमशासकीय क्षेत्रात सिंहगड इन्स्टिट्युट मधील विद्यार्थी हे सर्वाधिक निवडले जात आहेत. शैक्षणिक वर्ष सन २०२२ मध्ये अभियांत्रिकीची पदवी प्राप्त होणा-या १९६७ विद्यार्थ्यांना सिंहगड इन्स्टिट्युट मधुन नोकरी मिळाली आहे. यामध्ये अनेक नामांकित व बहुराष्ट्रीय कंपन्यांमध्ये विद्यार्थ्यांना मिळणारे पॅकेज हे ३ लाख ते ३० लाख वार्षिक पॅकेजच्या नोक-या सिंहगड इन्स्टिट्युट मधुन मिळाल्या आहेत. याशिवाय अजुन नामांकित व बहुराष्ट्रीय कंपन्या सिंहगड इन्स्टिट्युटला भेट देत आहेत.
सिंहगड संस्थेचा विस्तार खुप मोठा आहे. यामुळे या संस्थेत शिक्षण घेणारे विद्यार्थी हे संस्थेच्या नावावर निवडले जातात. सिंहगड इन्स्टिट्युट मध्ये अभियांत्रिकीचे शिक्षण घेण्यासाठी महाराष्ट्रातील व महाराष्ट्राच्या बाहेरील
विद्यार्थ्यांची चढाओढ होत असुन यावर्षीच्या प्रथम वर्ष अभियांत्रिकीच्या प्रवेशात सिंहगड इन्स्टिट्युटने महाराष्ट्र राज्यात प्रथम फेरीत प्रथम क्रमांक बाजी मारली असुन तब्बल ४००७ विद्यार्थ्यांनी सिंहगड इन्स्टिट्युट ला पसंती दर्शवली आहे.
ज्या विद्यार्थ्यांना सिंहगड इन्स्टिट्युटच्या प्रथम फेरीत प्रवेश मिळाला नाही अशा विद्यार्थ्यांना दुसर्या फेरीतील सर्व जागा खुल्या करण्यात आल्या आहेत. तरी इच्छुक विद्यार्थ्यांनी सिंहगड इन्स्टिट्युट मधील प्राचार्य डॉ. कैलाश करांडे व प्रा. सोमनाथ कोळी यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.


No comments:
Post a Comment