Breaking

Wednesday, 8 December 2021

मंगळवेढा तालुका प्रतिनिधी /अमिर आतार - सिंहगड महाविद्यालयात डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन.


*पंढरपूर सिंहगड महाविद्यालयात डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन*

कोर्टी (ता.पंढरपूर) येथील एस. के. एन. सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरींग महाविद्यालयात डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून महापरीनिर्वाण दिनानिमित्त अभिवादन करण्यात आले.
      महाविद्यालयात डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन प्राचार्य डॉ. कैलाश करांडे यांच्या हस्ते करण्यात आले. यादरम्यान उपप्राचार्य डॉ. स्वानंद कुलकर्णी, प्रा. सोमनाथ कोळी, प्रा. उमेश घोलप, प्रा. सुमित इंगोले आदीच्या हस्ते दीपप्रज्वलन करून डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यात आले.
     या कार्यक्रमास महाविद्यालयातील नवनाथ माळी, संजय बनकर, विशाल म्हेञे, दत्तात्रय तांबवे, दत्तात्रय नवले, विजय नवले, दादासाहेब वाघमारे, पांडुरंग परचंडे, राहुल शेंडे, अमोल कोळी, देवबा सागर, गणेश वसेकर, धनाजी केवटे आदीसह महाविद्यालयातील सर्व शिक्षक व शिक्षेकेत्तर कर्मचाऱ्यांनी अभिवादन केले.

 पंढरपूर येथील सिंहगड महाविद्यालयातील महानिर्वाण दिनानिमित्त डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करताना शिक्षक वृंद.

No comments:

Post a Comment